Maharashtra Railway Owned By British: भारतीय रेल्वेची जगभरात चर्चा आहे. दिवसाला लाखो प्रवाशांना घेऊन धावणारी भारतीय रेल्वे जगातील विस्तृत रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. महाराष्ट्र हे रेल्वे नेटवर्कचे एक मोठे केंद्र आहे. अलीकडेच महाराष्ट्राला दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसचे लोकपंरपण झाले आहे. एकीकडे रेल्वे नेटवर्कचे जाळे विस्तारले जात असताना महाराष्ट्रातील एक रेल्वे अद्यापही ब्रिटनच्या खासगी कंपनीच्या नावे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शकुंतला रेल्वेची स्थापना १९१० मध्ये किलिक-निक्सन नावाच्या खाजगी ब्रिटीश कंपनीने केली होती. कंपनीने भारतात ब्रिटिश सरकारसोबत संयुक्त उपक्रम सुरू करून सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (CPRC) स्थापन केली. १९२१ मध्ये मँचेस्टरमध्ये बनलेल्या ZD-स्टीम इंजिनवर ही रेल्वे ७० वर्ष चालवली गेली त्यानंतर मूळ इंजिन १५ एप्रिल १९९४ रोजी डिझेल इंजिनने बदलण्यात आले.यवतमाळ ते मुंबई (बॉम्बे) मुख्य मार्गावर कापूस नेण्यासाठी नॅरोगेज लाइन बांधण्यात आली होती जिथून तो इंग्लंडमधील मँचेस्टरला पाठवला जात होता.

ब्रिटीश राजवटीत बांधलेली शकुंतला रेल्वे ही यवतमाळ आणि मूर्तिजापूर दरम्यानची १९० किमी लांबीची रेल्वे लाइन आहे. १९५२ मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा हा मार्ग बदलला गेला नव्हता आणि हा ट्रॅक आजही एकोणिसाव्या शतकात ज्या कंपनीने सुरु केला त्यांच्याच मालकीचा आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ब्रिटीश कंपनीला अजूनही रुळांवर ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून १ कोटींहून अधिक रुपये दिले जातात.

शकुंतला रेल्वे अजूनही नॅरोगेज लाइन वापरते आणि दररोज फक्त एकच परतीचा प्रवास करते. सध्या अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचे १९० किमी अंतर ही रेल्वे पार करते ज्यासाठी सुमारे २० तास लागतात. या प्रवासाचे तिकीट सुमारे १५० रुपये आहे.

हे ही वाचा<< एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

सध्या, शकुंतला रेल्वेच्या गाडीतून इंजिन वेगळे करणे, सिग्नलिंग आणि तिकीट विक्रीपर्यंत कामाची जबाबदारी सात कर्मचाऱ्यांकडून सांभाळली जाते. नॅरोगेज यवतमाळ-मुर्तिजापूर-अचलपूर रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी १५०० कोटी मंजूर केले आहेत.