2024 Maharashtra Assembly Election Vidhan Sabha Seat List In Marathi : १५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण ४५ जणांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेसाठी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि भाजपाने ९९ जागांची यादी जाहीर केली आहे. तर याच पार्श्वभूमीवर आज आपण महाराष्ट्रात विधानसभेच्या जिल्ह्यानुसार किती जागा आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र विधानसभेच्या जिल्ह्यानुसार जागा खालीलप्रमाणे…

महाराष्ट्र विधानसभेच्या जिल्ह्यानुसार जागा खालीलप्रमाणे…

क्र.जिल्हामतदारसंघ
१.अहमदनगर
अकोले, कर्जत जामखेड, कोपरगाव, नेवासा, पारनेर, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर (एससी), अहमदनगर शहर
२. औरंगाबाद</td>औरंगाबाद मध्य , औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर.
३.बुलढाणा
बुलढाणा, चिखली, जळगाव (जामोद), खामगाव, मलकापूर, मेहकर (एससी), सिंदखेडराजा
४.गडचिरोली
अहेरी (एसटी), आरमोरी (एसटी), गडचिरोली (एसटी).
५.जळगाव
अमळनेर, भुसावळ (एससी), चाळीसगाव, चोपडा (एसटी), एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर.
६.लातूर
अहमदनगर, औसा, लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर.
७.नागपूर
हिंगणा, कामठी, काटोल, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, सावनेर, उमरेड.
८.नाशिक
बागलान (एसटी), चांदवड, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, मांडगाव, नाशिक पूर्व, नाशिक मध्यम, नाशिक पश्चिम, निफाड, सिन्नर, येवला.
९.परभणी
गंगाखेड, जिंतूर, परभणी, पाथरी.
१०.रत्नागिरी
चिपळूण, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी.
११.सिंधुदुर्ग
कणकवली, कुडाळ, सावंतवाडी.
१२.वर्धा
आर्वी, देवळी, हिंगणगाठ, वर्धा.
१३.अकोला
अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर (एससी).
१४.बीड
आष्टी, बीड, गेवराई, केज, माजलगाव, परळी.
१५.चंद्रपूरबल्लारपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा.
१६.गोंदियाआमगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, तिरोरा.
१७.जालनाबदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जालना, परतूर.
१८.मुंबई शहर भायखळा, कुलाबा, धारावी (एससी), माहीम, मलबार हिल, मुंबादेवी, शिवडी, सायन कोळीवाडा, वडाळा, वरळी.
१९.मुंबई उपनगर अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, अणुशक्तीनगर, भांडुप पश्चिम, बोरिवली, चांदिवली, चारकोप, चेंबूर, दहिसर, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, कालिना, कांदिवली पूर्व, कुर्ला, मागाठणे, मालाड पश्चिम, मानखुर्द शिवाजीनगर, मुलुंड, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, विक्रोळी, विलेपार्ले.
२०.नांदेडभोकर, देगलूर, हदगाव, किनवट, लोहा, मुखेड, नायगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण.
२१.उस्मानाबादउमरगा, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर.
२२.पुणेआंबेगाव, बारामती, भोर, भोसरी, चिंचवड, दौंड, हडपसर, इंदापूर, जुन्नर, कसबा पेठ, खडकवासला, खेड, आळंदी, कोथरूड, मावळ, पर्वती, पिंपरी (एससी), पुणे कॅन्टोन्मेंट, पुरंदर, शिरूर, शिवाजीनगर.
२३.सांगलीइस्लामपूर, जत, खानापूर, मिरज, पलुस कडेगाव, सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहाकाळ.
२४.सोलापूरअक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य.
२५.वाशीमकारंजा, रिसोड, वाशिम.
२६.अमरावतीअचलपूर, अमरावती, बडनेरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट, मोर्शी, तिवसा.
२७.भंडारा
तुमसर, भंडारा, साकोली.
२८.धुळेधुळे ग्रामीण, धुळे शहर, साक्री, शिरपूर, सिंधखेडा.
२९.हिंगोलीवसमत, हिंगोली, कळमनुरी.
३०.कोल्हापूरचंदगड, हातकणंगले, इचलकरंजी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ.
३१.नंदुरबार अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर, शहादा.
३२.पालघरडहाणू, बोईसर, नालासोपारा, पालघर, वसई, विक्रमगड.
३३.रायगडअलिबाग, कर्जत, महाड, पनवेल, पेण, श्रीवर्धन, उरण.
३४.साताराकराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव, माण, पाटण, फलटण, सातारा, वाई.
३५.ठाणेऐरोली, अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कोपरी-पाचपाखाडी, मिरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड, ओवळा-माजिवडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर.
३६.यवतमाळआर्णी, दिग्रस, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी, यवतमाळ.

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीआधी ‘एबी’ फॉर्मची चर्चा; एबी फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत या फॉर्मला इतके महत्त्व का?

Maharashtra Assemblly Election 2024, 288 MLA's List
महाराष्ट्र विधानसभेत २०१९ ला कोणाचे किती आमदार होते? पक्षफुटीनंतरची स्थिती काय? वाचा २८८ आमदारांची यादी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Candidate List vs Maha Vikas Aghadi Candidate List in Marathi
Mahayuti vs Maha Vikas Agahdi Candidate : उद्या मतदान, तुमच्या मतदारसंघातील उमेदवार जाणून घ्या!
maharashtra assembly election latest news
महाराष्ट्रात पहिल्या निवडणुकीपासून कसं बदललं मतदारसंघांचं गणित? ही संख्या २८८ पर्यंत कशी पोहोचली?

तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. त्या कोणत्या जागा आहेत ते आपण जाणून घेतलं. राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात झाली होती. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र यंदा महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर आता राज्यातील महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्या असून, आधी जागावाटप व नंतर उमेदवार-निश्चिती अशी प्रक्रियाही सुरू झाली आहे.