महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. या दिवशी उपवास केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. बेलपत्र ही महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते. पण महादेवाला बेलच सर्वाधिक प्रिय का आहे, यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला यामागचे महत्वाचे कारण सांगणार आहोत. जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल..
बेलपत्रच्या पानांमध्ये ‘या’ देवतांचा समावेश
भगवान महादेव यांच्या पूजेमध्ये बेलपत्रचे विशेष असे महत्व आहे. साधारणपणे बेलपत्रला एकूण तीन पाने असतात. ही पाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. तसंच अनेकजण याला त्रिशूळ आणि भगवान महादेवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक देखील मानतात.
बेलाच्या झाडाची कथा..
बेलाच्या वृक्षाबद्दल स्कंद पुराणात सांगितले आहे की, एकदा देवी पार्वतीने कपाळावरील घाम पुसून पृथ्वीवर टाकला. त्यातील काही थेंब मंदार पर्वतावर पडले. जिथून या बेलपत्र वृक्षाची उत्पत्ती झाली. या झाडांच्या मुळांमध्ये गिरिजा, खोडात माहेश्वरी, फांद्यात दक्षिणायणी, पानात पार्वती, फुलांमध्ये गौरी आणि फळांमध्ये देवी कात्यायनी वास करते असे मानले जाते. असे म्हणतात की या झाडांच्या काट्यांमध्ये देखील अनेक शक्तींचा समावेश आहे.
( हे ही वाचा: ब्लेडच्या मध्यभागी रिकामी जागा का असते? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)
..म्हणून भगवान महादेवाला बेलपत्र आवडते
जेव्हा अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा पाणी म्हणजे हलहल विष प्राप्त झाले. या विषयाचा प्रभाव इतका तीव्र होता की सर्व देव आणि दानव या विषाने जळू लागले. विषाच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकला असता, परंतु हे विष सहन करण्याची क्षमता कोणाचीच नव्हती. त्यानंतर सर्वजण भगवान शंकराकडे गेले विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवानी ते विष प्यायले. विषाच्या प्रभावामुळे शिवाचा कंठ निळा पडला आणि शरीर तापू लागले. त्यानंतर महादेवाचे शरीर थंड ठेवण्यासाठी गंगाजल आणि अभिषेक करण्याबरोबरच देवदेवतांनी शिवाला बेलपत्र खाऊ घातले. त्यामुळे शिवाच्या शरीरातील उष्णता कमी होऊ लागली. तेव्हापासून असे मानले जाते की बेलपत्र हे भगवान महादेवाला खूप प्रिय आहे.