Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही अर्ज प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही अर्जप्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन अर्जाकरता तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, प्रभाग समितीमध्ये संपर्क साधू शकता. तर, ऑनलाईन अर्जाकरता अॅप आणि वेबसाईटचा वापर करू शकता. ऑफलाईन आणि अॅपवरील अर्जप्रक्रिया तुम्हाला माहीत झालीच असेल. आता तुम्हाला वेबसाईटद्वारे अर्जप्रक्रिया कशी भरायची हे आम्ही सांगणार आहोत.

वेबसाईटद्वारे लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा? (How To Apply Online for Ladki Bahin Yojana)

https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होणार पैसे, मंत्री उदय सामंतांनी दिली मोठी माहिती
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल

उजव्या बाजूला असलेल्या अर्जदार लॉगिनवर क्लिक करा.

खाली असलेल्या Creat Account वर क्लिक करा.

तुमच्या समोर आता साईनअपसाठी पेज ओपन झालेलं असेल.

तिथे असलेली माहिती भरा, कॅप्चा द्या आणि साईनअपवर क्लिक करा.

आता तुमचं अकाऊंट ओपन झालं.

आता होमपेजवर येऊन अर्जदार लॉगइनवर पुन्हा क्लिक करा आणि तिथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड भरा.

मेन्यूच्या बाजूला तीन पांढऱ्या रेषा असलेल्या सब मेन्यूबारवर क्लिक करा.

तिथे तुम्हाला Application For Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana वर क्लिक करायचं आहे.

तुमच्या समोर आता आधार कार्ड आणि कॅप्चा असलेलं पेज ओपन झालं असेल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून वेरिफाय आधार करायचं आहे.

वेरिफाय आधार केल्यानंतर तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आला असेल. त्या फॉर्ममधील माहिती भरा.

माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली कागदपत्रांचे फोटो अपलोड करायचे आहेत.

फोटो अपलोड करताना ५ एमबीच्या वर अपलोड करू नका. अन्यथा ते अपलोड होणार नाहीत.

संपूर्ण माहिती आणि कागदपत्र भरल्यानंतर सबमिट फॉर्मवर क्लिक करा. तुमच्यासमोर तुम्ही भरलेली माहिती आली असेल.

ही माहिती पुन्हा एकदा वाचा. या माहितीत काही बदल करायचे असतील तर काही असलेल्या ए़़डीटवर क्लिक करा. तिथे माहिती भरून पुन्हा सेव्ह करा.

आता तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी सज्ज आहे. खाली असलेल्या सबमिटवर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Application Submitted Successfully असा पॉप अप मेसेज येईल. तिथंच तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि तुमचं नाव असेल.

हा फॉर्म आता प्रशासनाकडून तपासला जाईल. तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल तर काही दिवसांनी तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारला असल्याचा मेसेज येईल.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर; आदिती तटकरेंनी दिले आदेश!

लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत काय आहे? (When is Last Date of Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पूर्वी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु, अनेक कारणांमुळे काही महिला अर्ज भरू शकल्या नाहीत. त्यामुळे सरकारने शासन निर्णय जारी करून  ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, अस महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Story img Loader