‘मराठी भाषा वळवावी तशी वळते’ असं नेहमीच आपल्या ऐकण्यात येत असतं. पण याचा अर्थ असाही नाही की मराठी भाषेमध्ये कोणत्याही गोष्टी कोणत्याही अर्थासाठी वापरता येऊ शकतात. मराठी भाषेमध्ये प्रत्येक म्हण किंवा वाक्प्रचारामागे निश्चित अशी पार्श्वभूमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. या वाक्प्रचारांचे अर्थ कधी अगदी प्राचीन काळापासून आपल्यापर्यंत चालत आलेले असतात, तर कधी ते अगदी आजही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असणाऱ्या घटना किंवा क्रियांमधून निर्माण झालेले असतात.

अनेकदा या क्रिया आपल्या जीवनातील इतर एखाद्या घडामोडीला इतक्या तंतोतंत लागू पडतात की त्यासाठी आधीच्या नियमित क्रियांचा वापर वाक्प्रचार म्हणून होऊ लागला. उदाहरणार्थ घरातलं धान्य पाखडून, निवडून मग दळून त्या पिठाचा वापर करण्याची पद्धत आपल्याकडे अगदी पूर्वीपासून चालत आली आहे. धान्य पाखडून झाल्यानंतर शेवटी सूपाला खालच्या बाजूने वाजवून शेवटी उरलेलं धान्य व्यवस्थित पाखडलं जाईल याची काळजी घेतली जाते. त्यामुळेच एखादं कार्य किंवा कार्यक्रम संपला, की त्यासाठी ‘सूप वाजलं’ असा वाक्प्रचार वापरण्याचा प्रघात रूढ झाला. असाच आणखी एक रूढ झालेला वाक्प्रचार म्हणजे ‘दोघांमधून विस्तवही न जाणे’!

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कुठे वापरला जातो वाक्प्रचार?

कथा-कादंबऱ्यांमधून अनेकदा आपल्या वाचनात हा वाक्प्रचार आला आहे. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण द्यायचं झालं, तर कधीकाळी मित्र असणारी किंवा अगदी सख्खी भावंडं असणारी राजकीय नेतेमंडळी वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेल्यानंतर त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची अनेक उदाहरणं अगदी महाराष्ट्राच्या राजकारणातही पाहायला मिळतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याची किंवा टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी ही मंडळी सोडत नाहीत. तेव्हा त्यांच्यातून विस्तवही जात नाही, असं म्हटल्याचं आपण ऐकतो. पण विस्तव आणि वैरभाव यांचा नेमका संबंध आहे तरी काय?

विस्तव आणि वितुष्ट यांचं काय आहे नातं?

यासंदर्भात मराठी भाषाविषयक तज्ज्ञ निधी पटवर्धन यांनी हा वाक्प्रचार नेमका कसा रूढ झाला असावा, याची माहिती दिली आहे. “पूर्वीच्या काळात चूलीचा वापर व्हायचा. अजूनही ग्रामीण भागात काही प्रमाणाच चुलीचा वापर होतो. तेव्हा आपल्या घरातला चुलीचा विस्तव विझल्यास एखाद्या घरातून विस्तव मागितला जायचा. शेजारधर्म म्हणून तो विस्तव दिलाही जायचा. पण विस्तव जात नाही याचा अर्थ त्यांच्यात सलोख्याचं नातं नाही. म्हणून ते एकमेकांकडून विस्तव मागू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांकडून विस्तव जात नाही अशी स्थिती होती. त्यावरूनच पुढे वैरभावाचं वर्णन करण्यासाठी त्यांच्यातून विस्तव जात नाही, असा वाक्प्रचार रूढ झाला”, अशी माहिती निधी पटवर्धन यांनी दिली.

‘सूप वाजलं’ म्हणजे काय? अधिवेशनाची सांगता झाल्यावर हा वाक्प्रचार का वापरतात?

आपल्या रोजच्या व्यवहारातील इतर अनेक वाक्प्रचारांप्रमाणेच हाही वाक्प्रचार अशाच क्रिया-प्रक्रियेतून रूढ झाल्याचं दिसून येत आहे. ग्रामीण भागात दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी बराच अवकाश असतो. त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक करण्याआधी बराच वेळ गोवरी पेटवून ती राखेखाली घुमसत ठेवली जाई. जेणेकरून स्वयंपाकापर्यंत विस्तव तयार व्हावा. अनेकदा हा विस्तव विझून गेल्यानंतर इतर कुणाकडूनतरी त्यांच्या चुलीतला विस्तव मागून आणला जाई. सलोख्याचे संबंध असले, तर विस्तव देवाण-घेवाणीची ही प्रक्रिया बिनबोभाट चाले. पण जर भांडण असेल, तर मात्र त्यांच्यातून विस्तव जात नसे!

Story img Loader