Mazi Ladki Bahin Yojana Updates : लाडकी बहीण योजनेत दीड हजारांऐवजी १ रुपयाच मिळणार? मराठीतील अर्ज बाद होणार? नव अपडेट्स लगेच जाणून घ्या!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचा लाभ घेण्याकरता कोट्यवधींचे अर्ज सरकार दरबारी प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू केल्याने अर्ज भरणाऱ्यांमध्ये वाढ होत जात आहे. परिणामी तितक्याच अडचणीही निर्माण झाल्या आहेत. तसंच, योजनेबाबत काही गैरसमजही पसरवले जात आहेत. त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून याबाबत खुलासा केला आहे.

मराठीतील अर्ज होणार बाद?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) मराठीतून केलेले अर्ज बाद केले जातील, अशी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी मराठीतून अर्ज केले होते, त्या अर्जदार महिलांमधून नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत होता. तर, काही महिलांनी पुन्हा अर्ज भरायलाही सुरुवात केली होती. परंतु, मराठीतील अर्ज बाद केले जाणार नसल्याची स्पष्टोक्ती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

sharad pawar eknath shinde ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Sharmila Thackeray Thane, Sharmila Thackeray,
महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Supriya Sule, Devendra Fadnavis,
दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता; सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

बुलढाणा जिल्ह्यातील मोतळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात (Mazi Ladki Bahin Yojana) एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेतील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटींमुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली.

दरम्यान, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार आहोत. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये”, असं आवाहनही आदिती तटकरे यांनी केलं आहे. (Mazi Ladki Bahin Yojana)

हेही वाचा >> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कुठे कराल अर्ज? पात्र कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

पैसे खात्यात केव्हा जमा होणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्मान निधी रक्षाबंधन म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही योजना १ जुलैपासून लागू झाली असल्याने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांना मिळणार आहेत. (Mazi Ladki Bahin Yojana)

माझी लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये काय? (Features of Mazi Ladki Bahin Scheme)

  • ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी असेल.
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ
  • या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेला पात्र कोण असणार? (Who is Eligible Mazi Ladki Bahin Scheme)

  • सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे.
  • २१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.
  • इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.