World’s Most Dangerous Bird: तुम्ही कधी ऐकलंय का की कोणत्या पक्षापासून मानवाला धोका आहे? कोणत्या पक्षामध्ये माणसाला संपवण्याची ताकद आहे? असा कोणता पक्षी आहे हे विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. जगभरात असे फारसे पक्षी नाहीत ज्यांना मानव घाबरत असेल, पण कॅसोवेरी हा पक्षी वेगळा आहे. “जगातील सर्वात धोकादायक पक्षी” म्हणून ओळखले जाणारे ते ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीच्या उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्टमध्ये राहतात. ज्वलंत निळा चेहरा, तीक्ष्ण नखे यामुळे हा पक्षी सुंदर दिसत असला तरी तो तितकाच धोकादायक आहे. त्याचे वजन ३१० किलोपर्यंत असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पक्ष्याला जर तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला तो पटकन शहामृगासारखा दिसतो. तर कोणाला एमूसारखा. हा पक्षी खूप उंच असतो. त्याच्या पायात खूप ताकद असते. त्याशिवाय त्याच्या पायाची बोटं ही टोकदार असतात. कॅसोवेरी हा पक्षी असला तरी तो उडू शकत नाही.

कोणत्या प्रदेशात आढळतो हा पक्षी?

कॅसोवेरी हा पक्षी मुख्यत: पापुआ न्यू गिनी, पश्चिमी पापुआ, अरु आयर्लंड आणि उत्तर पूर्व ऑस्ट्रेलिया या परिसरात आढळतो. या पक्ष्याच्या तीन प्रजाती संपल्या आहेत. सध्या सगळ्यात जास्त कोणत्या जातीतील कॅसोवेरी हे पक्षी असतील तर ते दाक्षिणात्य कॅसोवेरी आहेत. दाक्षिणात्य कॅसोवेरी हा पक्षी जगातील सगळ्यात जास्त उंच आणि सगळ्यात जास्त वजन असणाऱ्या पक्षांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या पेक्षा मोठे कोणते पक्षी असतील तर ते फक्त शहामृग आणि एमू आहेत.

असे म्हटले जाते की, कॅसोवेरी हा पक्षी घाबरणारा आहे आणि सामान्यत: त्यांना शोधणेही कठीण असते. ते फार हिंसक नसून क्वचितच मानवांवर हल्ला करतात. पण, नाराज किंवा राग आला तर ते खूप नुकसान करू शकतात. जरी हे मोठे पक्षी उडण्यास असमर्थ असले तरी त्यांच्या अविश्वसनीय मजबूत पायांमुळे ते त्वरीत हालचाल करू शकतात. ते जमिनीवर आणि पाण्यात वेगाने फिरू शकतात. रेनफॉरेस्टमध्ये, कॅसोवेरी ताशी ३१ मैल वेगाने धावत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या मजबूत पायांमुळे, कॅसोवेरी हवेत सात फूट उंच झेप घेऊ शकतात आणि त्यांच्या शत्रूला शक्तिशाली लढा देऊ शकतात. मानवांवर किंवा इतरांवर हल्ला करण्यासाठी ते आपल्या तीक्ष्ण नखांचा वापर करतात. हे प्राणी मोठे आणि भीतीदायक दिसत असले तरी कॅसोवेरी या पक्षानं मानवांवर जेवढे हल्ले केले नाहीत तेवढे हल्ले मानवाने या पक्षावर केले आहेत, असे कम्युनिटी फॉर कोस्टल अँड कॅसोवेरी कॉन्झर्व्हेशनचे संस्थापक पीटर रोल्स यांनी सांगितले.

काय खातात कॅसोवेरी?

कॅसोवेरी हे साधारणपणे फळं खातात. पण, गरज भासल्यास मासे, उंदीर, छोट्या जनावरांची शिकारदेखील करतात. अनेकदा तर ते पाल, बेडूक आणि सापदेखील खातात. कॅसोवेरी खूप चांगल्या प्रकारे पाण्यात पोहतात, त्यामुळे त्यांना जलचरांची शिकार करायला खूप सोपं जातं.