What is Gen Beta : जानेवारी २०२५ ला जेन अल्फाचं युग संपून जेन बीटाचं पर्व सुरू होणार आहे. म्हणजेच २०२५ ते २०२३९ या १४ वर्षांच्या काळात जन्माला येणारी पिढी जेन बेटा म्हणून ओळखली जाणार आहे. १९८१-१९९६ हा जेन मिलिनिअलचा काळ होता, १९९६-२०१० हा जेन झेड म्हणून ओळखला गेला, २०१० ते २०२४ ला जेन अल्फा म्हणून ओळख मिळाली. तर आता नव्या वर्षांत म्हणजेच २०२५ मध्ये जन्माला येणारी मुलं जेन बीटा म्हणून ओळखली जाणार आहेत. मनी कंट्रोलने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांच्या लेखानुसार २०३५ पर्यंत जगात जेन बीटाची १६ टक्के लोकसंख्या असेल. तसंच जेन मिलिनिअल्स आणि जेन झेडची ही मुलं असतील. तसंच,ही पिढी २२ वं शतक पाहू शकणार आहे.
हेही वाचा >> जगातील सर्वांत महागडी नाणी कोणती? एकेकाची किंमत ऐकून बसेल धक्का
जेन बीटा नाव कसं पडलं
जनरेशन बीटा हे जनरेशन अल्फाला फॉलो करणार आहे. त्यामुळे पहिल्या पिढीला सुचित करण्यासाठी नव्या पिढीला जेन बीटा नाव देण्यात आलंय. ही पिढी पूर्णपणे भिन्न जगाने आकार घेईल. जनरेशन बीटा हा आपल्या विकसित होत असलेल्या जगाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.
जेन बीटाची पाच महत्त्वाची वैशिष्ट्ये
२०२४ च्या सुरुवातीपासून जगरताल आर्टिफिशिअल इंन्टेलिजन्सचा वापर सुरू झाला. जेन बीटा या नव्या यंत्रणेचा सर्रास वापर करताना दिसणार आहे. तसंच, स्मार्ट उपकरणांचाही यांच्याकडून अधिक वापर केला जाईल.
सोशल मीडिया या जनरेशनसाठी त्यांची भूमिका विकसित करण्याचं माध्यम ठरणार आहे.
आपत्कालीन स्थितीत शाळा बंद राहणं, सामाजिक अंतर ठेवणं अशा गोष्टींपासून ही पिढी लांब राहिल. याच्या आधीच्या पिढीने करोनोमुळे ही सामाजिक स्थिती अनुभवली आहे.
लोकसंख्याशास्त्रज्ञ आणि भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांनी त्यांच्या जनरेशन बीटा ब्लॉगमध्ये लिहिलंय की, महत्त्वाच्या सामाजिक आव्हानांशी झुंजत या जगाला वारसा मिळणार आहे. पर्यावरणीय आव्हानांमुळे त्यांच्या सुरुवातीच्या जीवनात सामाजिक मुल्यांना आकार देतील.
संशोधक जॅसन डोर्सी म्हणाले, आम्ही लहानपणी जेन मिलिनिअल्सबद्दल बोलत होतो. पण जनरेशन बीटा जनरशन अल्फापेक्षाही वेगळ्या पद्धतीने सुरू करेल. तसंच, या पिढीतील अनेकजण २२ वं शतकही पाहतील.