How to use Meta AI in Whatsapp : व्हॉट्सअपची मूळ कंपनी असलेली मेटाने आपल्या सर्व सोशल मिडिया प्लाटफॉर्मवर एआय फिचर्स उपलब्ध केला आहे. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर एआय चॅटबॉट उपलब्ध झाला आहे. या एआय चॅटबॉटमुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअप हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे. या ॲपचे कोट्यवधी वापरकर्ते जगभरात आहेत. व्हॉट्सअपच्या अनेक फिचर्समुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. व्हिडिओ कॉल, वॉईस कॉल, डॉक्युमेंट, पेमेंटसारख्या सुविधा व्हॉट्सअपवर सुरू झाल्याने वापरकर्त्यांना इतर ॲप्सची फार कमी गरज लागते.

आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता गुगलची मदत घेतो. गुगलवर आपल्याला हवा तो प्रश्न विचारला की त्याचे असंख्य उत्तर आपल्यासमोर येतात. आता व्हॉट्सअपने हीच सुविधा मेटा एआयच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. व्हॉट्सअपच्या न्यु चॅट आयकॉनच्यावर मेटा एआयचा आयकॉन आहे. तिथं क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एआयचा चॅटबॉक्स ओपन होतो. या चॅटबॉक्सला तुम्ही कोणतेही प्रश्न विचारले तरी त्याची सहज सेकंदभरात उत्तरे मिळतात. त्यामुळे हे चॅटबॉक्स कसं वापरायचं हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.

हेही वाचा >> Meta AI in India : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर कसे वापरता येईल मेटा AI? जाणून घ्या…

व्हॉट्सअपने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार हे वैशिष्ट्य फक्त मर्यादित देशांमध्येच उपलब्ध आहे. तसंच, ही सुविधा केवळ इंग्रजीतच वापरता येते.

व्हॉट्असॅपवर एआय कसं वापराल? [How to Use Meta AI in WhatsApp?]

  • व्हॉट्सअप सुरू केलं की न्यू चॅट्सच्या आयकॉनच्या वर मेटा एआयचा आयकॉन आहे.
  • या आयकॉनवर क्लिक करा.
  • तिथं क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या अटी वाचा आणि मान्य करा.
  • त्यानंतर चॅटबॉट सुरू होईल.
  • या चॅटबॉटवर तुम्हाला हवा तो प्रश्न, शंका लिहा. लिहून झाल्यानंतर एंटर करा.
  • प्रश्न विचारल्यानंतर काहीच सेकंदात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल.

या फिसर्सचं वैशिष्ट्य काय? (What is Feature of Meta AI in WhatsApp)

  • तुम्ही तुमचा चॅट ज्याप्रमाणे डिलिट करता त्याचप्रमाणे एआय चॅटबॉटवर विचारलेला प्रश्नही डिलिट करण्याची सोय आहे.
  • मेटाच्या गोपनीयता धोरणाशी सुसंगत एआय चॅट आहे. हे वैशिष्ट्य वापरून तुम्ही मेटाच्या एआय सेवा अटींनी सहमती दर्शवता.
  • एआयद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूकच असतील असंही नाही, असंही व्हॉट्सअपने कबुल केलं आहे.
  • या सुविधेत केवळ इंग्रजीतून उत्तरे मिळत असली तरीही तुम्ही कोणत्याही भाषेत प्रश्न विचारू शकता. परंतु, तुम्हाला उत्तरे इंग्रजीतूनच उपलब्ध होणार आहेत.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta ai in whatsapp ai feature in whatsapp know how to use it step by step sgk
First published on: 29-06-2024 at 10:54 IST