Milk Contains Alcohol: “अरे दारूवर खर्च करण्यापेक्षा दूध पी” एखाद्या अत्यंत दारुड्या माणसाला अनेकजण सल्ला देताना तुम्हीही ऐकले असेल. रोजच्या वापरात अनेकजण गाय, म्हैस फार फार तर बकरीचे दूध पितात. या दुधांमध्ये प्रोटीन व व्हिटॅमिनचे प्रमाण मुबलक असतात. पण तुम्हाला माहित आहे का की असा एक प्राणी आहे ज्याचे दूध ही अल्कोहोलपेक्षा जास्त नशायुक्त असतात. एका वैज्ञानिक रिसर्चनुसार या प्राण्याच्या दुधात बियर किंवा व्हिस्कीपेक्षाही अधिक नशा असू शकते. आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना की हा असा प्राणी आहे तरी कोणता? आणि जर का माणसाने या दुधाचे सेवन केले तर तो नशेत धुंद होऊ शकतो का? चला तर हा अभ्यास नेमका काय होता जाणून घेऊया…
‘या’ प्राण्याच्या दुधात असते अल्कोहोल?
२०१५ मध्ये ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हत्तीणीच्या दुधात आढळणारी रसायने इतर कोणत्याही प्राणी किंवा प्रजातींपेक्षा जास्त आहेत. या संशोधनात असे आढळून आले की आफ्रिकन हत्तीणीच्या दुधात ६२ टक्के अल्कोहोल असते, जे व्हिस्कीच्या बाटलीत सापडलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असते. त्यात ऑलिगोसॅकराइड नावाचे कार्बोहायड्रेट देखील मोठ्या प्रमाणात असते. या कार्बोहायड्रेटमुळे पोट भरपूर प्रमाणात फुगणे, गॅस आणि अतिसार देखील होऊ शकतो. हे एक प्रकारचे कठीण कार्बोहायड्रेट आहे, जे मानवी शरीराद्वारे सहज पचत नाही.
हे ही वाचा<< IPL फायनल ते वर्ल्ड कप सर्वत्र हिरो ठरणारा क्रिकेटचा ‘सीझन बॉल’ कसा बनतो? Video मधील प्रक्रिया पाहून व्हाल थक्क
हत्तीणीच्या दुधात अल्कोहोल असते कारण…
हत्तीणीच्या आहारात ऊस भरपूर प्रमाणात असतो. ऊस हा इथेनॉलचा मुख्य स्त्रोत आहे जो अल्कोहोल बनवण्यासाठी वापरला जातो. एक हत्ती दररोज सरासरी १५० किलो अन्न खातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने, हत्तीणीने उत्पादित केलेल्या दुधात पोषक घटक तसेच ऊसामुळे अल्कोहोल असते आणि त्यामुळे ते मानवी आतड्यांद्वारे पचणे आणि शोषून घेणे कठीण होऊ शकते.