Minimum bank balance: सरकारी बँकांनी किमान शिल्लक (Minimum Balance) न ठेवल्याबद्दल त्यांच्या ग्राहकांकडून एकत्रितपणे सुमारे ८,४९५ कोटी रुपये वसूल केल्याची बातमी अलीकडेच आली होती. या बातमीनंतर बँकांमध्ये नेमका किती मिनिमम बॅलन्स असायला हवा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक (SBI), गेल्या काही वर्षांपासून किमान शिल्लक न ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. तथापि, इतर अनेक सरकारी बँका असे शुल्क आकारत आहेत. त्यापैकी पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक दंड वसूल केला, ज्याची रक्कम १.५३८ कोटी रुपये इतकी आहे. मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल विविध बँकांनी लादलेल्या शुल्कांची माहिती आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा… कुठे गोलगप्पा तर कुठे गुप-चुप! तुमची आवडती पाणीपुरी आहे ‘या’ ८ नावांनी प्रसिद्ध

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचे संपूर्ण तपशील जाणून घ्या

१. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

२०२० पासून SBI ने बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले नाही.

२. आयसीआयसीआय बँक (ICICI)

या बँकेत किमान शिल्लक ५,००० रुपये असणे आवश्यक आहे. किमान शिल्लक खात्यात न ठेवल्यास, आवश्यक किमान सरासरी शिल्लकमध्ये १०० रुपये + ५% कमी रकमेचा दंड (Minimum average balance-MAB) आकारला जातो.

३. एचडीएफसी बँक (HDFC)

एचडीएफसी बँकेसाठी मेट्रो आणि शहरी भागांसाठी १०,००० रुपये किंवा एक वर्ष आणि एक दिवसाच्या एफडीसाठी १ लाख रुपये सरासरी महिन्याचा मिनिमम बॅलन्स आवश्यक आहे. निमशहरी भागांसाठी, एक वर्ष आणि एक दिवसाच्या एफडीसाठी ५,००० रुपये किंवा ५०,००० रुपये असा नियम आहे. हा नियम पाळण्यात अयशस्वी झाल्यास सरासरी शिल्लक रकमेच्या ६% किंवा रु ६०० दंड आकारला जातो.

हेही वाचा… रेल्वे तिकिटावरील PNR नंबर म्हणजे काय? यात दडली असते प्रवाशांची महत्त्वाची माहिती, जाणून घ्या

४. पंजाब नॅशनल बँक (PNB)

खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास ग्रामीण भागासाठी ४०० रुपये, निमशहरीसाठी ५०० रुपये आणि शहरी/मेट्रो भागांसाठी ६०० रुपये दंड आहे.

५. येस बँक (YES BANK)

किमान शिल्लक शुल्क आकारले जात नाही.

६. ॲक्सिस बँक (AXIS BANK)

मूलभूत बचत खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही; तर मेट्रो आणि शहरी भागात ६०० ते ५० रुपये, निमशहरी भागात ३०० ते ५० रुपये आणि ग्रामीण भागात १५० ते ७५ रुपये दंड आकारला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minimum bank balance do you know which bank is charging how much for not maintaining minimum balance sbi hdfc icici pnb axis bank yes bank dvr