why are mirrors in lifts : विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाची अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. मोबाईल फोन असो की लॅपटॉप, सगळ्याच कामांचा वेग तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. याच तंत्रज्ञानातील एक जबरदस्त शोध म्हणजे लिफ्ट. लिफ्टच्या साहाय्याने आज उंचच- उंच इमारतीत आपल्याला पाहिजे त्या मजल्यावर पोहचता येते. यासाठी लोकांना जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. यामुळे वेळेचीही बचत होते. मुख्य म्हणजे चालण्याचे श्रम वाचतात. पण लिफ्टमध्ये हल्ली आपल्याला आरसे पाहायला मिळतात, पण अनेकांना वाटते हे आरसे आपला चेहऱ्या बघण्यासाठी असतात. पण तसे नाही. हे आरसे तुमचा चेहरा बघण्यासाठी नाही तर एका वेगळ्या कारणासाठी असतात जे कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊ यामागचे कारण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिफ्टमध्ये आरसे का बसवले जातात?

कार्यालये, मॉल्स आणि इतर उंच इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा असते. अनेकजण आपल्या दैनंदिन जीवनात लिफ्टचा वापर करतात. पण अलीकडे अनेक लिफ्टमध्ये आपल्याला आरसे पाहायला मिळतात. तुम्ही आजवर अनेक लिफ्टमध्ये हे आरसे पाहिले असतील. पण लिफ्टमध्ये हे आरसे तुमचा चेहरा पाहण्यासाठी नसतात. तर त्यामुळे लिफ्टचा आतील भाग मोकळा दिसतो आणि जास्त जागा दिसते, त्यामुळे लोकांना गुदमरल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे लिफ्टच्या आत असणाऱ्या लोकांनाही बरे वाटते.

लिफ्टमध्ये आरसे बसवण्याचे कारण काय?

जेव्हा लिफ्ट वापरण्यास सुरुवात झाली तेव्हापासून अनेकांना लिफ्टचा वेग खूप वेगवान आहे असे वाटू लागले. लोकांनी याबाबत तक्रारीही केल्या, यानंतर असे का होते त्यामागचे कारण शोधण्यात आले. तेव्हा असे कारण समोर आले की, लोक लिफ्टच्या आतील मोकळ्या भिंतींवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्यांना लिफ्ट अधिक वेगाने वर- खाली जात असल्याचे वाटते. यामुळे अनेकांना चक्कर आल्यासारखे देखील वाटते. या समस्येवर उपाय म्हणून लिफ्ट निर्माता कंपन्यांनी लिफ्टच्या भिंतींवर आरसे बसवण्यास सुरुवात केली. यामुळे लिफ्टमध्ये लोकांचा टाईमपास देखील होतो आणि लिफ्टमध्ये मोठा स्पेस आहे असेही जाणवते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mirror in the lift is not meant to see the face reason will leave you wondering sjr