एचआयव्ही नावाची जागतिक महामारी सुरू झाल्यापासून तब्बल ४० वर्षांनी यावर उपाय सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगातील करोनाची पहिली लस आणणाऱ्या अमेरिकेतील फार्मास्युटिकल आणि बायोटेक कंपनी मॉडर्ना एचआयव्ही लसींसाठी मानवी चाचण्या घेणार आहे, असं त्यांनी जाहीर केलंय. या लशीदेखील करोना लसीप्रमाणेच mRNA तंत्रज्ञानावर आधारित असतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मॉडर्ना त्यांच्या एचआयव्ही लशींच्या दोन व्हर्जनच्या चाचण्या घेणार आहे. ही एचआयव्हीवरील mRNAची पहिली लस आहे, ज्याची मानवांवर चाचणी केली जाणार आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीनुसार, १८ ते ५० वयोगटातील ५६ HIV-निगेटीव्ह लोकांना पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चार गट असतील. यातील दोन गटांना लसीचा मिश्र डोस दिला जाईल, तर इतर दोन गटांना दोनपैकी एक लस दिली जाईल. या चाचणीत सहभागी होणाऱ्या लोकांना ते कोणत्या गटात आहेत, त्याची माहिती दिली जाईल.
इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सीन इनिशिएटिव्ह (IAVI) आणि स्क्रिप्स रिसर्चने विकसित केलेल्या दोन mRNA लसींचा वापर शेवटी एका दुसऱ्या लसीसोबत केला जाईल. दोन मॉडर्ना लसींमध्ये प्रभावी तटस्थ अँटीबॉडीज तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बी-सेलची क्षमता आहे आणि दुसरी लस त्यांना तसे करण्यास प्रभावित करेल. IAVI आणि इतरांनी पुरस्कृत केलेल्या या चाचण्या मे २०२३ पर्यंत चालण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्याचा कालावधी १० महिने असेल.
जगभरात एड्सचे रुग्ण किती?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एड्समुळे आतापर्यंत जगभरात ३ कोटी ६० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २०२० च्या अखेरपर्यंत जगभरात ३ कोटी ७० लाखांपेक्षा अधिक लोक एचआयव्ही संसर्गासह जगत आहेत. मात्र, एचआयव्हीवर अद्याप कोणतंही औषध नाही. परंतु अलिकडच्या वर्षांत आरोग्य तज्ञांना एचआयव्ही रोखण्यासाठी उपाय, रोगाची ओळख आणि काळजी घेण्यासह एचआयव्हीचे व्यवस्थापन करण्यात यश आले आहे. भारताच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या २०१९ च्या एचआयव्ही अहवालानुसार, देशात २३ लाखांहून अधिक लोक एचआयव्ही संसर्गासह जगत आहेत. दरम्यान,२००० पासून, भारतात १५ ते ४९ या वयोगटातील लोकांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण कमी झाले असून अलिकडच्या वर्षांत ते स्थिर होत आहे.
लस बनवण्यात अडचणी का येतात..
“एचआयव्हीमध्ये खूप लवकर बदल होतो, त्यामुळे त्याच्या विरोधात कोणत्याही अँटीबॉडी तयार करणे कठीण आहे. तसेच एचआयव्हीचे प्रोटीन कव्हर हे साखरेच्या लेपने झाकलेली असतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारक प्रतिसादाच्या निर्मितीवर परिणाम होतो. एचआयव्हीविरोधी लस तयार हे एक आव्हान आहे. कारण त्याचे विषाणु वेगाने दुसरे विषाणु तयार करतात तसेच म्युटेट होतात.” असे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ.आर.आर. गंगाखेडकर म्हणाले.
अँटिबॉडीज तयार केल्यावरही, ते कार्यक्षम होईपर्यंत, व्हायरस वेगाने विकसित होतो. सतत होणारं म्युटेशन व्हायरसला अँटिबॉडीपासून बचावासाठी बाहेर पडू देते, असे आघाडीचे लस शास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले. उदाहरणार्थ, तीन महिन्यांच्या अंतराने एचआयव्ही चाचणी न घेतलेल्या व्यक्तीचे विषाणूचे क्रम नंतरच्या आणि पूर्वीच्या विषाणूंमध्ये फरक दर्शवेल, असे त्या म्हणाल्या.
लस बनवण्याचे पूर्वीचे प्रयत्न..
डॉ. कांग म्हणाल्या की यापूर्वी व्हायरसच्या निष्क्रिय रुपांवर आणि अॅडेनोव्हायरस व्हेक्टरवर आधारीत लसींचे प्रयत्न झाले होते. परंतु त्यात यश आले नाही. काही लसींच्या क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या होत्या, परंतु लस कुचकामी ठरल्यामुळे एकतर त्या थांबवण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. दुसरीकडे, एडेनोव्हायरस व्हेक्टर लसीच्या बाबतीत, असे आढळून आले की चाचणीमध्ये सहभागी झालेले सहभागी झालेले लोक हे लसीमुळे सुरक्षित होण्याऐवजी एचआयव्हीसाठी जास्त संवेदनशील होते.
राष्ट्रीय करोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ सदस्य आणि संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. संजय पुजारी म्हणाले, “रोगप्रतिकारक प्रतिसादाचे अचूक परस्परसंबंध ओळखण्यात असमर्थता असणं हे एचआयव्ही लस तयार करण्यासमोरचे मुख्य आव्हान आहे. ज्याला एचआयव्हीच्या विविधतेविरोधात संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रेरीत करण्याची आवश्यकता असते. तसेच, एचआयव्हीचे प्रोटीन आणि सीडी 8 टी पेशींविरूद्ध व्यापकपणे तटस्थ अँटीबॉडीज प्रेरित करणे हा त्यामागचा मुख्य हेतू असतो.
mRNA लस आशेचा नवा किरण..
डॉ. कांग म्हणाल्या की, मॉडर्ना लसींची चाचणी पुर्णपणे वेगळी आहे. कारण ते लस डिजाईन करण्यासाठी आणि तेवढ्याच लवकर ती विकसीत करण्यास एक तंत्रज्ञान वापरतात. हे करोना विषाणूच्या लसीच्या विकासासारखेच आहे, ज्यामध्ये शरीराच्या पेशी विषाणूचा स्पाइक इन्व्हलप तयार करू शकतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
डॉ.पुजारी म्हणाले की, एचआयव्हीच्या संदर्भात, mRNA लसीने विट्रो आणि माकडांच्या चाचण्या दरम्यान आशादायक परिणाम दिले आहेत. त्यामुळे मानवांवर त्याची चाचणी करणे खूप उपयुक्त ठरेल. mRNA लस ही मानवाच्या RNA मध्ये असा बदल करेल ज्यामुळे एचआयव्हीचे दुसरे व्हेरिएंट तयार होऊ शकणार नाही आणि इम्यून रिस्पॉन्स सिस्टमपासून बचाव करू शकणार नाहीत. mRNA लसीच्या विकासामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान तंत्रज्ञान राहिले आहे. पण, करोना विषाणूची mRNA लस बनवून, आम्ही यात यश मिळवले आहे, असेही ते म्हणाले.
लसीबद्दल तज्ज्ञांचं मत काय?
तज्ञांचे म्हणणे आहे की एचआयव्ही लसीच्या बाबतीत, दोन मार्ग असू शकतात – एक प्रतिबंध आणि दुसरा उपचार. डॉ. किंवा लसीकरण झालेल्या लोकांमध्ये एचआयव्ही विरूद्ध प्रतिकार विकसित होतो का. दुसरीकडे, उपचारित लसीच्या बाबतीत, व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण होईल, जी संक्रमित पेशी मारेल आणि संसर्ग आणखी पसरण्यापासून रोखेल.
आयुष्यभर घ्यावी लागतात औषधे..
डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, उपचारात्मक लसीला मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार करण्यासाठी मानवी पेशींना प्रेरित करावे लागेल. अँटीरेट्रोव्हायरल थेरपी संसर्गाचा प्रसार थांबवू शकते. काही लोकांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात आणि त्याचे दुष्परिणाम देखील होतात. परंतु एक चांगली वैद्यकीय लस आणि औषधं एचआयव्हीवरील उपचार होऊ शकतात. मात्र, त्यांचा इम्यून रिस्पॉन्स किती काळ टिकतो हे शोधण्यासाठी या लसींची दीर्घकाळ तपासणी आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.