आपण सर्व जण वीज, पाणी, गॅस, इंटरनेट आणि बरेच काही यांसारख्या विविध उपयुक्तता सेवा वापरतो. या सेवांचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडून संबंधित सेवा देणारी कंपनी मासिक किंवा वार्षिक आधारावर शुल्क आकारते. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी आपण या बिलाची रक्कम भरतो आणि व्यवहार पूर्ण करतो. ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि बिल वेळेवर भरण्यास मदत करण्यासाठी, NPCI ने UPI वापरकर्त्यांसाठी AutoPay लाँच केले आहे. AutoPayमुळे ग्राहकांना त्यांचे दर महिन्याला येणारे बिल वेळेवर भरता येते. मूलभूत सुविधांव्यतीरिक्त ॲप सबस्क्रिपशन आणि ऑनलाइन सेवांसाठीदेखील आता ऑटोपे वापरता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुमच्या खात्यातून दर महिन्याला किंवा वर्षभरात विशिष्ट रक्कम आपोआप डेबिट होत असेल तर तुम्ही किंवा तुमच्या वतीने कोणीतरी तुमच्या UPI खात्यावरील काही सेवेसाठी ऑटोपे सक्रिय केले असण्याची दाट शक्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एखाद्या अॅपचे सबस्क्रिप्शन घेतले असेल किंवा बिल पेमेंट करण्यासाठी ऑटोपे सुरू केले असेल तर कालांतराने तुम्ही ते थांबवू किंवा बंद करू शकता. ऑटोपे बंद कसे करायचे जाणून घेऊ या.

काही सोप्या स्टेप वापरून तुम्ही तुमच्या UPI खात्यावर कोणत्या सेवांसाठी ऑटोपे सुरू केले आहे ते तपासू शकता.

हेही वाचा – पुण्यातील या जोगेश्वरीला ‘पिवळी जोगेश्वरी’ का म्हणतात? जाणून घ्या काय आहे इतिहास?

UPI खात्यावर ऑटोपे कसे नियंत्रित करावे याबद्दल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन खालील प्रमाणे:

इतर UPI ॲप्ससाठीदेखील तुम्ही अशाच प्रकारे ऑटोपे बंद करू शकता. PhonePe वर तुम्ही ते कसे करू शकता ते येथे दिले आहे.

  • पायरी १: तुमच्या UPI ॲपवर जा.
  • पायरी २: आता स्क्रिनच्या डाव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
  • पायरी ३: आता पेमेंट मॅनेजमेंट विभागामध्ये ऑटोपे पर्याय शोधा.
  • पायरी ४: ऑटोपे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि कोणत्या सेवांकरिता ऑटोपे वापरत आहात ते दिसेल.
  • पायरी ५ : तुम्हाला ऑटोपे तात्पुरते थांबवायचे असल्यास संबंधित सेवेवर क्लिक करा आणि नंतर ‘पॉज’ पर्यायावर करा.
  • स्टेप ६ : तुम्हाला ऑटोपे सेवा कायमची बंद करायची असेल तर स्क्रिनवर खाली स्क्रोल करून तुम्हाला ‘ऑटोपे हटवा’ किंवा कॅन्सल ऑटोपे हे पर्याय दिसतील, त्यावर क्लिक करून ऑटोपे हटवू शकता.

हेही वाचा – विमान प्रवासात कोणत्या गोष्टी घेऊन जाण्यास कठोर बंदी असते?

दरम्यान, स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ते आता फक्त कॉल करण्यासाठी आणि संदेश पाठवण्यासाठी वापरले जात नाहीत तर डिजिटल पेमेंट आणि बँकिंगसाठीदेखील वापरले जातात. आपले स्मार्टफोन्स कागदपत्रे, फोटो, ॲप्स, सोशल मीडिया तपशील आणि लोकेशन डेटा यांसारख्या वैयक्तिक माहितीचा खजिना संग्रहित करतात.

ही माहिती चुकीच्या हाती लागल्यास त्यातून फसवणूक होऊ शकते. स्मार्टफोनवरील अनेक ॲप्सना ऑपरेट करण्यासाठी विशिष्ट परवानग्या आवश्यक असतात. हे ॲप्स अनइन्स्टॉल केल्यानंतरही ते तुमची वैयक्तिक माहिती गोळा करत राहू शकतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money being deducted automatically every month heres how to stop upi autopay snk