YouTube Shorts: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूब (YouTube) आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर्स लाँच करत आहे, या फीचर्समुळे तुम्हाला पैसेही कमविता येणार आहे. देशात असे अनेक युट्युबर्स (YouTubers) आहेत जे युट्युबवर व्हिडीओ कंटेंट तयार करून वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. जर तुम्हालाही युटयुबच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर युट्यूब तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलं आहे. कंटेंट क्रिएटर्ससाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण रिल्सच्या माध्यमातून क्रिएटर्सना पैसे कमावता येणार आहेत.

YouTube ची काय आहे योजना ?

, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bride Tuji Navari song dance
“काय नाचतेय ही…”, ‘ब्राईड तुझी नवरी’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
woman receiving a whole set of Diwali gifts from her husband
VIRAL VIDEO : ‘प्रत्येक बायकोचं स्वप्न…’, दिवाळीनिमित्त दिलं हटके गिफ्ट; बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवणाऱ्या नवऱ्याचं होतंय कौतुक
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

मागील काही दिवसांअगोदर युट्यूबने इंस्टाग्राम रिल्स प्रमाणे Shorts चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. अलीकडेच YouTube ने कंटेंट क्रिएटर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की आता युजर्स यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून पैसे कमवू शकतील. तथापि, हे फीचर केवळ काही देशांमध्ये चाचणी मोडमध्ये रिलीज केले गेले आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, ते सर्व देशांमध्ये सादर केले जाईल. आता कंपनीने YouTube Shorts वर देखील कमाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ वापरकर्ते आता YouTube शॉर्ट्समध्ये जाहिराती देऊन कमाई करू शकतील. नव्या फीचरची चाचणीही सुरू झाली आहे.

( आणखी वाचा : Smartphone Offers: खुशखबर! विवोच्या ‘या’ दमदार स्मार्टफोनवर मिळतेय ६,५०० रुपयांची सूट; पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर! )

काय आहे युट्युब शॉर्ट्स?

युट्यूब शॉर्ट्स हा युट्युबवरच्या कमी कालावधीच्या व्हिडीओंचा फॉरमॅट आहे. यामध्ये जास्तीत जास्त ३० सेकंदांपर्यंत व्हिडीओ तयार करायचा असतो. हे एक प्रकारे Tik-Tok व्हिडिओंसारखेच आहे. भारतासह जगभरात टिकटॉक (TikTok) व्हिडीओची क्रेझ निर्माण झाली होती.

या अॅपवर छोटे-छोटे व्हिडीओ बनवून अपलोड करता येतात. बरेच वापरकर्ते या अॅपमध्ये सामील झाले होते आणि त्यातून चांगले पैसे कमावत होते. हे फीचर स्वीकारून, YouTube ने YouTube Shorts नावाने ते सादर केले.

हा फीचर चाचणी मोडमध्ये, नुकतेच यूएस, ऑस्ट्रेलिया, भारत, कॅनडा आणि ब्राझीलमध्ये हा फीचर रिलीज करण्यात आला आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे फीचर संपूर्ण जगासाठी प्रसिद्ध केले जाईल.

याप्रमाणे दिली जाईल रक्कम

कंटेंट क्रिएटर्सना युट्यूब शॉर्ट्सच्या कमाईतील ४५ टक्के रक्कम दिली जाईल आणि उर्वरित ५५ टक्के रक्कम कंपनी ठेवेल, असे कंपनीने सांगितले आहे.

आतापर्यंत या फीचरची कमाई केली जात नव्हती, त्यामुळे वापरकर्ते हे फीचर फॉलोअर्स बनवण्यासाठी वापरत होते पण आता ते पैसे कमवण्यासाठी याचा वापर करू शकतील.