Beautiful Himalayan destinations : भारत हा एक असा देश आहे, जिथे अनेक उल्लेखनीय पर्यटनस्थळे आहेत. भव्य हिमालय पर्वतरांगांपासून ते गोव्याच्या सुंदर बीचेसपर्यंत.. कधीही फिरायला जायचा विषय निघाला तर, कुठे आणि कसं जायचं यावर चर्चा सुरू होते. भारतामध्ये पर्यटकांना निवडता येतील अशी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत. त्यामधून तुम्ही भव्य पर्वत, नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, समुद्रकिनारे, गजबजणारी शहरे व शांत ऐतिहासिक वास्तूंचा आनंद घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशातील नयनरम्य अशा ठिकाणांची आणि गावांची माहिती देणार आहोत. त्यामुळे फिरायचा प्लॅन करण्याआधी या गावांबद्दल जाणून घ्या. हिमाचल प्रदेशमध्ये अशी गावे आहेत की, जिथे गेल्यावर तुम्हाला एखाद्या चित्रात पाहिलेल्या गावाचा भास होईल.
काझा
हिमाचल प्रदेशातील काझा हे गाव स्पिटी व्हॅलीची राजधानी आहे. काझा या गावातून इतर निसर्गरम्य ठिकाणंही पाहायला मिळतात. जवळपासचे मठ आणि ट्रेकिंगला जाण्यासाठी हे गाव एक उत्तम पर्याय आहे. येथून आपल्याला आजूबाजूच्या पर्वतांची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात. त्यामुळे हिमाचल प्रदेशात आल्यावर या गावाला नक्की भेट द्या.
धरमकोट
हिमाचल प्रदेशातील मॅक्लिओड गंजपासून हाकेच्या अंतरावर धरमकोट आहे. इथेही तुम्ही भेट देऊ शकता, तुम्हाला जर छोटीशी ट्रेकिंग करायची असेल, तर या गावात तुम्ही जाऊ शकता.
सांगला
हिमाचल प्रदेशातील सांगला हे गाव बास्पा व्हॅलीमध्ये आहे. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव सफरचंदांच्या बागा आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीसह निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखलं जातं.
चोपटा
हिमाचल प्रदेशातील चोपटा हे एक असं गाव आहे की, ज्याला ‘भारताचं मिनी स्वित्झर्लंड’ असंही म्हटलं जातं. हे एक हिरवंगार गाव आहे. या गावातून तुंगनाथ मंदिरासह हिमालयाची विलोभनीय दृश्यं दिसतात.
मुनसियारी
हिमाचल प्रदेशातील मुनसियारी येथून पंचचुली शिखरांचं मनोहारी दर्शन होतं. हे ट्रेकर्समधील एक लोकप्रिय ठिकाण आहे.
नाको
हिमाचल प्रदेशात येणारे नाको हे गाव भारत-तिबेट सीमेजवळ स्थित आहे. या ठिकाणी एक सुंदर तलाव, प्राचीन मठ आणि आश्चर्यकारक पर्वतरांगा पाहायला मिळतात. एकंदरीत हे गाव म्हणजे एक लपलेलौ हिमालय रत्न आहे.
हेही वाचा >> Dream: माणसाला झोपेत स्वप्न का पडतात माहितीये का? जाणून घ्या
कल्पा
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील कल्पा हे कैलास पर्वतश्रेणीचे मनमोहक दृश्यं दाखविणारं सर्वांत सुंदर गाव आहे. हे गाव सफरचंदांच्या बागा आणि सुंदर लाकडी घरांनी वेढलेलं आहे.
हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी अशी वेगवेगळी नयनरम्य ठिकाणं आपण निवडू शकता.