World’s most expensive coins: आज संपूर्ण जग आर्थिक बाबतीतील देवाण-घेवाण करण्यासाठी ‘यूपीआय’च्या सुविधेचा वापर करतंय. एका स्कॅनरनं आपलं काम अगदी सोपं करून टाकलंय. अवघ्या काही सेकंदांत आजकाल कोणतंही ट्रान्झॅक्शन अगदी सहजपणे केलं जातं. आधी पैसे घेऊन फिरणारा माणूस आता कॅशलेस व्यवहार करतोय. पण, यापूर्वी कागदी पैसे आणि नाण्यांद्वारे मोठमोठ्या उद्योगांचा आर्थिक व्यवहार सांभाळला जायचा. त्यावेळी त्या नाण्यांना फार मोल होते. ते मोल लक्षात घेता, आज आपण जगातील सर्वांत जुन्या आणि महागड्या नाण्यांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
सेंट गॉडेन्स डबल ईगल (Saint-Gaudens double eagle)
हे नाणे १९०७ ते १९३३ या काळात बनवण्यात आले होते. आज ही फक्त १२ नाणी शिल्लक आहेत. अमेरिकेत झालेल्या लिलावात एका नाण्याची किंमत १६३ कोटी रुपये लावली गेली होती.
फ्लोइंग हेयर डॉलर (Flowing Hair dollar)
१७९४ मध्ये फेडरल सरकारने जारी केलेले हे नाणे पहिले डॉलरचे नाणे होते. त्याची आजची किंमत १०७.५७ कोटी रुपये आहे.
हेही वाचा… भारतातील ‘या’ राज्याला कोहिनूर म्हटलं जातं, यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…
ब्रॅशर डबलून (Brasher Doubloon)
या एका नाण्याची किंमत ८० कोटी रुपये आहे. जगात अशी फक्त सात नाणी शिल्लक आहेत. हे नाणे १७८७ मध्ये न्यूयॉर्कमधील सोनार इफ्रेम ब्रॅशर यांनी बनवले होते.
फ्लोरिन (Florin)
आपल्या खास डिझाईनमुळे ही दुर्मीळ नाणी मौल्यवान मानली जातात. नीलानीमध्ये याचे एक नाणे ५५.०८ कोटी रुपयांना विकले गेले होते.
हेही वाचा… क्रेडिट कार्डवरून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहेत? मग ‘या’ स्टेप्स करा फॉलो
गोल्ड दिनार (Gold dinar)
उमय्याद साम्राज्याच्या काळात हे नाणे तयार करण्यात आले होते. त्याच्या एका नाण्याची किंमत ४३.७८ कोटी रुपये इतकी आहे.
कॅनेडियन गोल्ड मेपल लीफ (The Canadian Gold Maple Leaf)
हे नाणे शुद्ध सोन्याचे आहे. या एका नाण्याची किंमत ४२.९५ कोटी रुपये होती. लिलावाच्या वेळी या नाण्याचे मूल्य निश्चित करण्यात आले.
पुर्तगाली ४०० रीस (Portugal 400 Reis)
१७९७ मध्ये पोर्तुगीज सरकारने हा पहिला कागदी पैसा म्हणून स्वीकारला. त्यानंतर हे पहिले नाणे १८०७ मध्ये जारी केले गेले. या नाण्याची किंमत ४० कोटी रुपये आहे.