Moti Saban an Diwali Connection History : दिवाळी म्हटल्यावर फराळ आला, पणत्या आल्या, रोषणाई आली, उटणं आलं अन् त्याचबरोबर आवर्जून येणारी गोष्ट म्हणजे मोती साबण. आज दिवाळी आणि मोतीसाबण हे समीकरण अभेद्य आहे. उटणं, सुवासिक द्रव्य अभ्यंगस्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावे इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी घरोबा केला आहे. दिवाळी म्हणजे दिवे, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे कंदील तसंच दिवाळी म्हणजे मोती साबण हे अद्वैत आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपल्या आसपास पसरला असताना या तेजाला सुगंधी साथ हवी हवीशी वाटते. ती ओढ आपल्यालाच नाही तर आपल्या पूर्वजांनाही असावी आणि म्हणूनच दीपावलीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाचं प्रयोजन त्यांनी केलं. या स्नानात उटण्याचं महत्त्व ही पारंपरिकता आहे. पण ज्या ब्रॅण्डने स्वत:चं अस्तित्व निर्माण करत या परंपरेला आपल्या नवतेची जोड दिली तो ब्रॅण्ड म्हणजे मोती साबण. ‘‘उठा उठा दिवाळी आली.मोती स्नानाची वेळ झाली’’ असं म्हणत दिवाळीच्या मंगल पर्वाला जोडलेला अविभाज्य असा हा ब्रॅण्ड. त्याची कथादेखील तिमिरातूनी तेजाकडे अशीच आहे.

bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
NHAI
महामार्गावर प्रवास करताना ‘हा’ क्रमांक लक्षात ठेवा, अपघातात आणि इतर संकटात मिळेल मदत
ब्रॅण्डनामा : मोती साबण
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Happy Vasubaras 2024 Wishes in Marathi| Happy Govatsa Dwadashi 2024 wishes in marathi
Vasubaras 2024 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
Delhi Pregnant teen murder
Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…

या साबणाने सुरुवातीपासून शाही थाट दाखवला
सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. मोती या नावाला साजेसा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासून शाही थाट दाखवला. त्याची २५ रुपये किंमत त्या काळाच्या तुलनेत अधिक होती. या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडीनिवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. ऐंशीच्याा दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठ्या शिंपल्यात विराजमान मोती साबण कित्येकांना आठवत असेल. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता.

दिवाळी कनेक्शन कसं निर्माण झालं?
मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा, अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोडला. दिवाळी आणि मोती हे नातं नव्वदीत दृढ झालं. पण त्यापलीकडे या साबणावर मधल्या काळात फारसं लक्ष दिलं गेलं नाही. काहींनी तर आठवणीतील ब्रॅण्ड या सदरात त्याची भरती केली.

…अन् आली ती जाहिरात
अनेक विश्लेषकांनी हा ब्रॅण्ड अपयशी ठरल्याचा शिक्का मारला. आणि २०१३ मध्ये ती जाहिरात आली. टिपिकल चाळीचं वातावरण, वयस्कर-तरुण- बाल अशा तिन्ही पिढय़ांचा खुबीने जाहिरातीत केलेला वापर आणि मुख्य म्हणजे ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ ही पंचलाइन.. या सगळ्या गोष्टी ग्राहकांना भूतकाळात नेण्यासाठी योजल्या होत्या.

ग्राहकांना भूतकाळातून वर्तमानात आणलं होतं आणि मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं वातावरण तयार केलं गेलं. याच काळात सोशल मीडिया प्रभावी झाला होता. ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ या पंचवर इतके विनोद समाजमाध्यमांवर फिरते राहिले की वर्षभर गुडूप असलेला मोती साबण दिवाळीत मात्र तेजीत आला. एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ  शकतं याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण आहे.

मैसूर सॅण्डलचं अपयश मोतीच्या पथ्यावर
वास्तविक मोती साबणाहून चंदनी साबण या वर्गात दर्जा, सुगंध या दृष्टीने मैसूर सॅण्डल सोपचं स्थान अधिक वरचं आहे. सन १९१६ मध्ये मैसूरचे महाराज कृष्णराज वोडीयार चौथे यांनी दिवाण विश्वेश्वरय्या यांच्या मदतीने मैसूर सॅण्डलवूड ऑइल फॅक्टरी सुरू केली. पहिल्या महायुद्धामुळे परदेशी निर्यात होणारा चंदनाचा ओघ कमी झाला होता आणि इतक्या चंदनाचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी या चंदन फॅक्टरीतून शोधलं. एका परदेशी हितचिंतकाने चंदनी साबण त्यांना भेट दिला. त्यातून मैसूर सॅण्डल सोपची कल्पना विकसित झाली. वास्तविक अस्सल चंदनतेलापासून बनणारा हा जगातील एकमेव साबण आहे. पण त्याचा वापर दक्षिण भारतापुरता मर्यादित राहिला आणि त्याहीपेक्षा चाळिशीखालील ग्राहकवर्गास आकर्षित करण्याचे प्रयत्न मैसूर सॅण्डल सोपकडून कमी पडले. याची परिणती अशी की उत्तम दर्जा असूनही मोती साबणाप्रमाणे हवा निर्माण करण्यात मैसूर सॅण्डलला यश मिळाले नाही. अपयशाच्या गर्तेतून मोती साबण मात्र वेगाने वर आला.

(मूळ लेख: ब्रॅण्डनामा : मोती साबण )