Who Will Get First installment of 4,500 rs in Ladki Bahin Yojna? ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांचा या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवातही झाली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३०० रुपये जमा करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. दरम्यान, सरकारने नुकतेच या योजनेच्या नियमात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. तुम्हीही अर्ज केला आहे, मात्र अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका. कारण नवीन बदलानुसार अजूनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हप्त्यांचे म्हणजे एकूण चार हजार ५०० रुपये जमा होतील. मात्र, नेमक्या कोणत्या महिलांना चार हजार ५०० रुपये मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा