Mumbai Cheapest Shopping Market : शॉपिंग अनेकांच्या आवडीचा विषय आहे. सुटीच्या दिवशी अनेक जण आवडीने शॉपिंग करायला जातात. कोणताही ग्राहक नेहमी शॉपिंग करायला जाताना स्वस्तात मस्त वस्तू कुठे मिळतील, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आज आम्ही तुम्हाला मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील सर्वांत स्वस्त मार्केटविषयी सांगणार आहोत. जर तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल किंवा मुंबईत फिरायला जायचा विचार करीत असाल, तर या मार्केटला नक्की भेट द्या.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट स्वस्त सामानासाठी ओळखले जाते. या मार्केटमध्ये होलसेल म्हणजेच घाऊक किमतींमध्ये कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत सर्व काही कमी दरांत विकत मिळते. मुंबईतील या मार्केटमध्ये महिला आवर्जून साडी खरेदी करायला येतात. कारण- येथे एकापेक्षा एक सुंदर साड्या खूप कमी किमतीत मिळतात.
कपडे, ज्वेलरी याशिवाय या मार्केटमध्ये ड्रायफ्रूटस्, ग्रोसरी आणि अन्य घरगुती वस्तू मिळतात. हे मार्केट मुंबईच्या साउथ झोनमध्ये आहे. तुम्ही लोकल ट्रेनने या मार्केटला जाऊ शकता.
हेही वाचा : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, कसं ओळखायचं? टॉवेल वापरून तुम्ही क्षणात जाणून घेऊ शकता
क्रॉफर्ड मार्केट हे दर दिवशी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सुरू असते; पण रविवारी मात्र हे मार्केट बंद असते. त्यामुळे सुटीच्या दिवशी रविवारी तुम्ही या मार्केटला जायचा विचार करीत असाल, तर तुमचा प्लॅन बिघडू शकतो.
रविवारी हे मार्केट बंद असल्यामुळे अनेक लोकांना या मार्केटविषयी माहिती नाही; पण स्वस्तात मस्त खरेदी करायची असेल, तर रविवार सोडून इतर दिवशी एकदा तरी मुंबईच्या या फेमस क्रॉफर्ड मार्केटला भेट द्या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद घ्या.