Mumbai Goa Vande Bharat Express : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. देशभरात सध्या १८ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून मंगळवारी आणखीन पाच वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यामुळे देशभरात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या आता २३ झाली आहे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचाही (Madgao to CSMT Vande Bharat Express) समावेश आहे. मुंबई-गोवा या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने कोकणात कमी वेळात पोहोण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसंच, गोव्यासारख्या पर्यटन ठिकाणीही वेळेत आणि आरामशीर पोहोचता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ जून) राणी कमलापती (भोपाळ) ते इंदौर, भोपाळ ते जबलपूर, रांची ते पाटणा, धारवाड ते बंगळूरु आणि मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत ही वेगवान असल्याने या एक्स्प्रेसची मागणी वाढली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर वंदे भारतचीही या मार्गावरून १६ मे रोजी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले होते. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई-गोवा प्रवास करण्यासाठी कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

हेही वाचा >> देशाला आज मिळाली ५ वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे. देशातील सर्वात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली होती. तर सध्या राज्यात चार वंदे भारत धावत असून पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव धावणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर २ जून रोजी या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मात्र, त्याचदिवशी ओडिशात तिहेरी रेल्वे अपघात घडल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अखेर, आज या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून आजपासून मुंबई-गोवा या कोकण रेल्वे मार्गावरून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

हेही वाचा >> देशभरात २३ वंदे भारतचे जाळे

पावसाळ्यातील वेळापत्रक

गाडी क्रमांक २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील तीन दिवस धावणार आहे. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत.

पावसाळ्यातील वेळापत्रकामुळे वेगमर्यादा वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होण्याची शक्यता होती. मात्र मान्सून वेळापत्रकामुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल झाला असून वेगमर्यादा अद्याप निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सीएसएमटी-दिवा १०५ किमी प्रति ताशी वेग, दिवा ते रोहा ११० किमी प्रति ताशी वेग असण्याची शक्यता आहे.

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे कुठे?

या मार्गावरील रायगड जिल्ह्यात पनवेल व रोहा, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त कणकवली या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. यापैकी रत्नागिरी स्थानकावर ही गाडी ५ मिनिटे थांबणार आहे. मात्र अन्य सर्व स्थानकांवर ती फक्त दोन मिनिटे थांबेल. तसेच हे वेळापत्रक मान्सूनचा काळ वगळता वर्षांच्या उरलेल्या काळासाठी आहे, असेही रेल्वे खात्याने स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्यांचा वेग मान्सूनच्या काळात कमी असतो. त्यामुळे या चार महिन्यांसाठी त्या गाड्यांचे वेगळे वेळापत्रक असते. त्याच धर्तीवर याही गाडीचे हे वेळापत्रक पुढील महिन्यापासून बदलणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

तिकिट दर किती?

मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचे चेअर कारचे साधारण तिकीट दर १,४३५ रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्हचे तिकीट दर २,९२१ रुपये असे असणार आहेत.

पर्यटनाला चालना

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकर आणि पर्यटकांचा प्रवासाचा अनुभव आणखी बदलण्याची अपेक्षा आहे. मार्गाच्या चाचण्यांनी एक्स्प्रेसची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांची कठोर चाचणी घेतली जात आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची आणि आर्थिक वाढ होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.