जगभर हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणू बाधितांची राज्यातील संख्या रविवारी ३३ वर पोहोचली. तर रविवारी ९५ संशयितांना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र या करोनाच्या साथीदरम्यान सर्वाधिक वेळा एक शब्द पाहण्यात येतो तो म्हणजे COVID-19 पण कोव्हीड-१९ म्हणजे काय हे अनेकांना ठाऊक नाही. याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमधील वुहान या करोना विषाणूच्या केंद्रस्थान असेल्या शहरातून पसरलेल्या रोगामुळे जगभरामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या पाच हजारहून अधिक झाली आहे. मात्र अचानक या विषाणूचा उल्लेख नोव्हेल करोनावरुन (2019 novel coronavirus) कोव्हीड १९ (COVID-19) असा करण्यात येऊ लागला आहे. यामागील कारण म्हणजे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने या विषाणूचे नामकरण केलं आहे. करोना हा आजार असल्याचे WHO ने घोषित केलं आहे. हा आजार ज्या विषाणूमुळे होतो त्या विषाणूला COVID-19 हे नाव देण्यात आलं आहे.

एखादा रोग पसरवणाऱ्या विषाणूची उत्पत्ती कुठे, कधी आणि कशी झाली यावरुन WHO मार्फत त्या विषणूला नाव दिले जाते. याच पार्श्वभूमीवर COVID-19 हे नाव देण्यात आलं आहे. COVID-19 मधील COVID हा शब्द तीन शब्दांची अद्याक्षरे घेऊन तयार झाला आहे. यामध्ये CO म्हणजे Corona, VI म्हणजे Virus आणि D म्हणजे Disease या तीन शब्दांचा समावेश आहे. या तीन शब्दांचा मिळून COVID हा शब्द तयार झाला आहे.

आता प्रश्न पडतो हे १९ काय आहे. तर १९ हा आकडा या विषाणूचा कोणत्या साली शोध लागला त्यावरुन ठरवण्यात आला आहे. चीनमधील वुहानमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून या विषणुमूळे आजारी पडणाऱ्यांची नोंद सापडते. त्यामुळे या विषणूला नाव देताना 19 हा आकडा वापरण्यात आला आहे. म्हणजेच COVID-19 या नावाची फोड सोप्या भाषेत करायची झाल्यास १९ साली सापडलेला करोना व्हायरस आजार अशी करता येईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naming the coronavirus disease covid 19 scsg
Show comments