पारंपरिक कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर प्राचीन परंपरा टिकवणं, नव्याने रुजवणं आणि जगभरात त्याच दिमाखात पोहोचवणं शक्य होतं हे गेल्या काही वर्षांत सातत्याने हातमाग व्यवसायासाठी केल्या गेलेल्या ठोस प्रयत्नांतून दिसून आलं आहे. हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक. देशभरातील कोटय़वधी लोकसंख्या विशेषत: ग्रामीण भागातील लोक या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. हातमाग कला आणि  त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते.काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशा स्थितीत पोहोचलेल्या या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगच्या मदतीने पुन्हा एकदा लौकिक प्राप्त झाला आहे.

का साजरा केला जातो हा दिवस?

२०१५ पासून दरवर्षी आपल्याकडे ७ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची सुरुवात केली. “राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांना सलाम करतो. त्यांनी आपल्या राष्ट्राच्या स्वदेशी हस्तकलांचे जतन करण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत. आपण सर्वांनी #Vocal4Handmade बनूया आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रयत्न मजबूत करूया.” हे ट्विट २०१५ साली त्यांनी केलं होत. यामुळे अनेक कारागिरांना खूप फायदा होत आहे. आपल्या हातमागची ओळख संपूर्ण जगात होण्यास मदत होत आहे. केवळ साजरा करण्यापुरता हा दिवस मर्यादित न राहता आज हातमागाचे कपडे हे ब्रॅण्डेड म्हणून परदेशातही पोहोचविण्यात यानिमित्ताने हातभार लागला आहे.

Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
Republic Day 2025 Parade Ticket Booking Opens
Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाला परेड बघायला जायचंय? मग असे करा तुमचे तिकीट बुक; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
pm crop insurance scheme
शेतकऱ्यांना दिलासा; खतावरील अनुदान कायम, पंतप्रधान पीक विमा योजनेला बळ
CM Devendra Fadnavis On Happy New Year 2025
Happy New Year 2025 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

एका साडीने अनेकांचा रोजगार

हातमागाची एक साडी जरी विकत घेतली तरी अंदाजे १५ कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. हातमागाचे कपडे दीर्घकाळ टिकतात. आणि आता फॅशन विश्वात होऊ घातलेल्या रिसायकल, फ्युजन कपडे अशा पद्धतीने या हातमागाच्या कपडय़ांचा पुन:पुन्हा सुंदर पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. हातमागावर विणलेल्या कपडय़ांचे महत्त्व आता कुठे लोकांच्या लक्षात येऊ लागले असल्याने आता अधिकची पदरमोड करून हातमागाचे अस्सल, सुंदर कपडे घेण्याकडे लोकांचा कल हळूहळू वाढतो आहे.

देशभरातून सपोर्ट

देशभरात होणारी प्रदर्शने, भरवल्या जाणाऱ्या बाजारपेठा यामुळे हे कपडे सहज लोकांना उपलब्ध होऊ लागले आहेत. अगदी लॉकडाऊनच्या काळातही व्हच्र्युअल प्रदर्शनांच्या माध्यमातून ही कला पोहोचवली जात आहे आणि कारागिरांचा रोजगारही कायम राहिला. मिनिस्टरी ऑफ टेक्स्टाइलनेही वेगवेगळे प्रकल्प राबवून हातमाग व्यवसायाला उभारी देण्याचे सातत्याने के लेले प्रयत्नही फळाला आले आहेत. सरकारी प्रकल्पांमुळे डिझायनर्स, कपडे विकणारे, बुटिक चालवणारे यांना कारागिराशी थेट संपर्क करता येणंही शक्य झालं आहे.

Story img Loader