National Pension System : नोकरी करतानाच सेवानिवृत्तीनंतर पुढे कसे होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात फेर धरून नाचू लागतो. कारण- सरकारी नोकरी असेल, तर ठीक; पण, खासगी नोकरी असेल, तर सेवानिवृत्ती किंवा वयाच्या ५० वर्षांनंतर घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न समोर उभा राहतो. त्यामुळेच लोक सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करतात. पण, त्यासाठी किती पैसे लागतात आणि पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार आतापासूनच करायला हवा. तर निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System). येथे थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल पेन्शन सिस्टीम योजनेंतर्गत पैसे गुंतवण्याचे चार फायदे जाणून घेऊ…

नॅशनल पेन्शन सिस्टीमची नावनोंदणी झाली सोपी :

१. १८ ते ६५ वयोगटातील भारतीय नागरिक राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये eNPS पोर्टलद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन नावनोंदणी करता येते.
२. तसेच नागरिकांना Know Your Customer डॉक्युमेंट आणि सबस्क्रायबर (सदस्य फॉर्म) सबमिट करणे आवश्यक आहे.
३. टियर I (Tier I) हे एक सेवानिवृत्ती खाते आहे. तुम्हाला अकाउंट उघडण्याच्या दरम्यान किमान ५०० रुपये भरणे आवश्यक आहे. सेवानिवृत्तीपर्यंत किंवा वयाच्या ६० वर्षांपर्यंत तुम्हाला यातून पैसे तुम्हाला काढता येत नाहीत.

गुंतवणुकीचे पर्याय :

१. एनपीएएसमध्ये दोन प्रकारची खाती आहेत. त्यामध्ये Tier I and Tier II या अकाउंटचा समावेश आहे .
२. टियर I (Tier I) हे एक सेवानिवृत्ती खाते आहे आणि टियर II (Tier II ) एक स्वयंसेवी खाते आहे.
३. नागरिक सदस्य इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि पर्यायी गुंतवणूक यांच्यामध्ये मालमत्ता वाटप करण्यासाठी ॲक्टिव्ह पर्याय निवडू शकतात.
४. सदस्य ऑटो चॉइस निवडू शकतात; ज्याद्वारे वयाच्या आधारावर रकमेचे आपोआप वाटप केले जाते.

हेही वाचा…Pustakanch Gaav: महाराष्ट्रातील हे गाव ‘पुस्तकांच गाव’ म्हणून का ओळखलं जातं? काय आहे यामागील रंजक गोष्ट ; जाणून घ्या

कर सवलत दिली जाते :

१. एनपीएसमधील सेक्शन 80CCE कायद्याच्या अंतर्गत वार्षिक १.५ लाखांपर्यंत टॅक्स बेनिफीट मिळते.
२. हे पगारदार आणि स्वयंरोजगार अशा दोन्ही सदस्यांना लागू असते.
३. याव्यतिरिक्त कलम 80CCD(1B) कलमाअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कोणताही कर आकारला जात नाही.
४. एनपीएस योजनेमुळे तुम्हाला एकूण दोन लाख रुपयांच्या करबचतीचा फायदा होतो.

पैसे काढण्याचे नियम झाले सोपे :

१. वयाच्या ६० वर्षांपर्यंत किंवा निवृत्त झाल्यावर सदस्य त्यांच्या कॉर्पसच्या ६० टक्क्यांपर्यंत करमुक्त पैसे काढू शकतात.
२. तसेच उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शनवर खरेदी केली जाऊ शकते.
३. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधून ६० वर्षांच्या आधी बाहेर पडणे किंवा गंभीर आजारासारख्या कारणांसाठी पैसे काढणे आदी नियम समाविष्ट आहेत.

तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेवानिवृत्तीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करू शकतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National pension system focusing on savings during working life nps is an essential tool for effective retirement planning asp