Navratri 2023 Marathi News : महिषासूरमर्दिनी म्हणून ओळख असलेल्या अंबेमातेचा जागर करण्याचा सण म्हणजे नवरात्रोत्सव. या नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांत वातावरणात उत्साह भरलेला असतो. देवीची पूजा, अर्चा, आरती केल्यानंतर गरब्यासाठी ठेका धरला जातो. म्हणजेच हा सण भक्ती आणि उत्साहाचं प्रतिक आहे. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की नवरात्रीतच गरबा का खेळला जातो? याचविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

गरबा नृत्य म्हणजे काय?

गरबा नृत्य हे गुजरात राज्याचे पारंपरिक नृत्य आहे. जसं महाराष्ट्रात लावणी करणे, फुगड्या घालणे हे पारंपरिक लोककलाप्रकार आहेत. त्याचप्रमाणे गरबा हा गुजरातचा लोककला प्रकार आहे. गरबा सादर करताना नर्तक वर्तुळ आकारात ठेका धरतात. हा खेळ आता गुजरातपुरता मर्यादित नाही. तर, भारतात जिथं जिथं गुजराती समुदाय आहे त्या प्रत्येक ठिकाणी गरबा खेळला जातो. तसंच सर्व जाती-धर्माचे आणि प्रांतातील लोक गरबा नाचतात. त्यामुळे गरब्याला आता अनन्यसाधारण महत्त्व आलंय. अनेक ठिकाणी गरबा-दांडियाचं आयोजन केलं जातं. हा एक व्यावसायाचाही भाग झाला आहे. अनेक आयोजक मोठ मोठ्या सेलिब्रिटींना बोलावून गरबा नाईटचं आयोजन करतात. अशा गरबा नाईट कार्यक्रमात सहभागी होण्याकरता पासविक्री केली जाते. अनेक प्रसिद्ध गायक आणि नर्तक येथे येऊन गरबा रसिकांचं मनोरंजन करतात.

Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

हेही वाचा >> Navratri 2023: अंबाबाई, तुळजा भवानी, सप्तशृंगी: नवरात्रीमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध देवींच्या मंदिरांना आवर्जून द्या भेट

गरबा कसा खेळतात?

देशभर गरबा खेळला जात असला तरीही नवरात्रोत्सवात गरबा खेळण्याला पारंपरिक महत्त्व आहे. शहरी भागात स्पीकरवर गाणी लावून गरबा खेळला जात असला तरीही गुजरातमध्ये पारंपरिक पद्धतीने गरब्यावर ताल धरला जातो. यासाठी मध्यभागी एक घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्र पाडली जातात. त्यामध्ये एक दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती भक्तगण फेर धरतात आणि देवीची स्तुतीपरे गाणी गायली जातात. स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतिक म्हणून हा घडा मधोमध ठेवला जातो.

पारंपरिक गरबा कसा असतो?

बॉलिवूडसह अनेक प्रांतातील सिनेसृष्टीतील कलाकृतींमध्ये गरबा प्रकार दाखवला जातो. गरब्याला नृत्याप्रमाणे सादर केले जात असल्याने काही ठिकाणी गरब्याच्या स्टेप्स बदललेल्या पाहायला मिळतात. परंतु, मुळ गरबा प्रकारात नर्तक तीन टाळ्या वाजतात. या तीन टाळ्या म्हणजे त्रिदेवाला नमन करणे होय. पहिली टाळी ब्रम्हदेवाला, दुसरी टाळी भगवान विष्णुला आणि तिसरी टाळी महादेवाचं प्रतिक असल्याचं मानलं जातं. गरबा नृत्यामुळे निर्माण होणाऱ्या आवाजामुळे आई अंबे जागृत होते, असंही म्हटलं जातं.

पण नवरात्रीतच गरबा का?

महिषासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीतलावर थैमान माजवले होते. याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. परंतु, देवी जगदंबेने त्या राक्षसाचा वध केल्यानंतर लोकांनी जे नृत्य केले त्याला गरबा असे म्हणतात अशी आख्यायिका सांगितली जाते. या अख्यायिकेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचाही उल्लेख आढळतो. म्हणूनच पारंपरिक गरबा नृत्य प्रकारात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासाठी तीन टाळ्या वाजवल्या जातात. म्हणूनच नवरात्रीत गरबा खेळला जातो असं म्हटलं जातं.

हेही वाचा >> नवरात्री २०२३ : स्केटिंगवर गरबा खेळणारी “मुंबईची नमस्वी”

गरबा म्हणजे काय?

आपण वर वाचलं त्याप्रमाणे पारंपरिक गरबा प्रकारात मध्यभागी एक दिवा प्रज्वलित करून ठेवला जातो. याच दिव्याला दीपगर्भ असं म्हणतात. “दीपगर्भ घटाचे ‘गरभा’ असे नाव झाले आणि त्यातून ‘गरबा’ हे नाव उदयाला आले. गरबा म्हणजे छिद्र असलेले भांडे किंवा घडा”, अशी माहिती बीबीसी मराठीला गुजराती भाषा जाणकार केशव हर्षद ध्रुव यांनी दिली.

एका अखंड भांड्याला छिद्र पाडण्याला “गरबाकोरव्यो” म्हटलं जातं. म्हणूनच ‘गर्भादीप’ या मूळ संस्कृत शब्दावरून ‘गरबो’ हा शब्द गुजराती भाषेत आलाय. गरबो हे दैवी शक्तीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात असा गरबा डोक्यावर घेऊन किंवा मध्यभागी उभं राहून कुंडलो गाण्याची परंपरा आहे, असंही ध्रुव यांनी सांगितलं.

Story img Loader