Netflix unwanted device logout feature : काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरींगसंबंधी मोठी घोषणा केली होती. युजर्स वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरींगसाठी पैसे घेण्याचा निर्णय घेतला होता. आता कंपनीने यावर आणखी एक उपाय काढला आहे. हा उपाय तसे युजरला फायदेशीर ठरणार आहे. यामुळे नेटफ्लिक्सचे युजर वाढण्याचीही शक्यता आहे. नेटफ्लिक्स युजरसाठी मॅनेजिंग अ‍ॅक्सेस आणि डिव्हाइस पर्याय उपलब्ध करणार आहे. याद्वारे युजरला त्याच्या खात्यावरून नेटफ्लिक्सचा आनंद घेणाऱ्या नको असलेल्या लोकांना साइन आऊट करता येणार आहे.

मॅनेजिंग अ‍ॅक्सेस आणि डिव्हाइस फीचर होटेलमध्ये नेटफ्लिक्स वापरणाऱ्या युजरसाठी उपयुक्त ठरू शकते. हॉटोलमधून निघताना नेटफ्लिक्स खात्यावरून लॉगआऊट होण्याचे विसरल्यास या फीचरने तुम्ही त्या डिव्हाइसमधून साईन आऊट होऊ शकता. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हे फीचर युजरसाठी उपलब्ध होणार आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
mage of a laptop or mobile phone with a red "X" symbol, or a Supreme Court building photo
Right To Privacy : नागरिकांच्या गोपनीयतेला ‘सर्वोच्च’ स्थान, आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार
Pegasus logo
Pegasus : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

(एकापेक्षा अधिक स्मार्टफोनवर चालवता येईल एकच व्हॉट्सअ‍ॅप खाते, जाणून घ्या कसे)

मॅनेजिंग अ‍ॅक्सेस आणि डिव्हाइस फीचर सर्व्हरच्या बाजूने उपलब्ध होणार आहे. पण, ते उपलब्ध नसल्यास त्यासाठी युजर आपले अ‍ॅप अपडेट करू शकतात. हे फीचर भारतात उपलब्ध आहे आणि ते उपलब्ध आहे किंवा नाही हे तापसण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.

  • प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  • त्यानंतर अकाउंट्समध्ये मॅनेजिंग अ‍ॅक्सेस आणि डिव्हाइसेसमध्ये जा.
  • यात पासवर्ड शेअर केले असल्यास साइन टोगल करून तुमच्या खात्याला जोडलेल्या इतर लोकांना तुम्ही साईन आऊट करू शकता. हेच फीचर नेटफ्लिक्स वेब क्लाइंटवरही उपलब्ध आहे.

(Flipkart apple day sale : ३८ हजारांत मिळतंय ‘हा’ 5G आयफोन, ‘या’ मॉडेल्सवर मोठी सूट, जाणून घ्या सर्वोत्तम डिल्स)

कंपनीने या विषयी ब्लॉग पोस्टवर माहिती टाकली आहे. यामध्ये मॅनेजिंग अ‍ॅक्सेस आणि डिव्हाइस फीचरबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यात असे सागण्यात आले की, अनेक लोक सुट्टीत फीरतात, हॉटेलमध्ये किंवा मित्रांच्या घरी नेटफ्लिक्स वापरतात, मात्र अधूनमधून ते लॉग आऊट करायचे विसरतात. मॅनेजिंग अ‍ॅक्सेस आणि डिव्हाइसद्वारे तुमच्या खात्यावरून अलिकडे ज्या डिव्हाइसेसने नेटफ्लिक्सचा वापर केला आहे ते तुम्हाला दिसून येतील आणि त्यांना तुम्ही एका क्लिकने लॉग आऊट करू शकता, अशी माहिती दिली आहे.

Story img Loader