Driving License New Rules : ड्रायव्हिंग लायसन्स (वाहनचालक परवाना) मिळविणे हे सोपे काम नाही. या परवान्यासाठी (Driving License) लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रियांतून जावे लागते. चाचणीसाठी आरटीओमध्ये तासन् तास लांब रांगेत उभे राहावे लागते. पण, आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला चाचणी देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही. त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम १ जून २०२४ पासून लागू होतील.

नवीन नियमांनुसार स्थळानुरूप ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये एवढा दंड असेल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना पकडली गेल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच वाहनमालकाचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल आणि वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना परवाना मिळू शकणार नाही.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Maharashtra News Updates in Marathi
Maharashtra News Updates : हिंजवडी आयटी पार्कची कोंडी, महायुती सरकारमधील ‘हे’ मंत्री ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती

रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन चालक परवान्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांमध्येही बदल केले आहेत. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांच्या परवान्यांमध्येही गरजेनुसार बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.

खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांसाठी नवीन नियम

खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे अतिरिक्त दोन एकर जमीन आवश्यक आहे.

वाहनचालकाच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सुविधा खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षकांसाठी पात्रता : प्रशिक्षकांकडे किमान हायस्कूल डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित मूलभूत गोष्टी परिचित असल्या पाहिजेत.

प्रशिक्षणाचा कालावधी : कमीत कमी २९ तासांच्या प्रशिक्षणासह हलके वाहन प्रशिक्षण चार आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले जाणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण लेखी आणि प्रात्यक्षिक अशा किमान दोन विभागांमध्ये दिले गेले पाहिजे.

जड मोटार वाहन प्रशिक्षण : जड मोटार वाहनांसाठी आठ तासांचे लेखी शिक्षण आणि ३१ तासांची प्रात्यक्षिक तयारी, असे एकूण ३८ तासांचे प्रशिक्षण असेल. हे प्रशिक्षण सहा आठवड्यांच्या आत पूर्ण व्हायला हवे. खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांकडून हलक्या आणि जड वाहनांसाठी इच्छुक वाहनचालकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जावे हा या नियमांमागचा उद्देश आहे.

हेही वाचा >> हॅशटॅग या संकल्पनेच्या मागे कोण? हॅशटॅग नक्की कुणी बनवला? जाणून घ्या रंजक गोष्ट

विविध प्रकारच्या वाहनचालक परवान्यासाठी शुल्क रचना खालीलप्रमाणे :

१. शिकाऊ परवाना : रु. २००
२. शिकाऊ परवाना नूतनीकरण : रु. २००
३. आंतरराष्ट्रीय परवाना : रु. १०००
४. कायमस्वरूपी परवाना : रु. २००

वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता पालन करावयाच्या पायऱ्या खालीलप्रमाणे :

पोर्टलला भेट द्या : https://parivahan.gov.in.

एकदा होमपेजवर शोधा आणि ‘ड्रायव्हिंग लायसन्स लागू करा’ पर्यायावर क्लिक करा.

अर्ज फॉर्म उघडेल. अर्जातील सर्व आवश्यक माहिती अचूक भरा.

फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे अपलोड करा.

दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरावा.

तुमच्या पसंतीनुसार तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.

अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा (सबमिट) करण्यासाठी RTO ला भेट द्या.

तुम्ही जर पात्र असाल, तर वाहनचालक परवान्यासाठी तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला परवाना जारी केला जाईल.

Story img Loader