इटली हा देश प्राचीन संस्कृती तसेच वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि स्थापत्यासाठीही विशेष प्रसिद्ध आहे. प्राचीन इतिहास आणि संस्कृती असलेल्या या देशातही काही प्रथा रूढ आहेत, किंबहुना या परंपरा त्यांच्या आजच्या आधुनिक जीवनाचाही महत्त्वपूर्ण भाग आहेत. असेच काहीसे लाल रंगाच्या बाबतीतही आढळून येते. या देशात नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त होते. लाल रंग परिधान केल्याने नशीब बदलते अशी स्थानिक धारणा आहे. नवीन वर्षाच्या आगमनप्रसंगी हा रंग परिधान करणे ही इटलीतील एक प्राचीन प्रथा आहे. किंबहुना नव वर्षाच्या पूर्व संध्येला लाल रंगाची अंतर्वस्त्रे घालण्याची प्रथा तिथे प्रचलित आहे, म्हणूनच सध्या इटलीतील बाजारपेठा याच रंगाने रंगल्या आहेत. त्याच निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने इटलीत कोणत्या प्रथा साजऱ्या केल्या जातात हे जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

अधिक वाचा: केकचा शोध कोणी लावला; हे कसे घडले?

assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन

लाल रंग आणि नवीन वर्ष

रोमन संस्कृतीत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लाल पोशाख घालण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. किंबहुना, त्याची पाळेमुळे २३०० वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. सम्राट ऑक्टाव्हियन ऑगस्टसच्या काळात रोमन नवीन वर्षाच्या निमित्ताने येथील स्त्री-पुरुष समृद्धीचे प्रतीक म्हणून लाल रंगाचे कपडे परिधान करत असत असा संदर्भ सापडतो. नंतरच्या काळात, ही परंपरा अंतर्वस्त्रांशी जोडली गेली. मध्ययुगात, वाईट नशीब दूर करण्यासाठी मांडीचा सांधा लाल कापडाने झाकावा अशा प्रथा रूढ झाल्या. किंबहुना चेटूक सारख्या गोष्टींपासून लाल कपडा गुंडाळल्याने संरक्षण होते, अशी धारणा प्रचलित होती. त्यामुळेच लाल रंगातील अंतर्वस्त्रांनी शुभ अशुभाच्या संकेतांशी जुळवून घेत इथल्या उत्सवांवरही प्रभाव टाकला. परंतु ही प्रथा का सुरु झाली यामागे वेगवेगळे संदर्भ सांगितले जातात. इटलीमध्ये ही प्रथा साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काही जण ३१ डिसेंबरच्या सायंकाळी अंतर्वस्त्र उलटे परिधान करतात, त्यानंतर मध्यरात्रीनंतर नवीन वर्षाच्या आगमनाबरोबर अंतर्वस्त्रे सुलट करत योग्य पद्धतीने परिधान केली जातात. तर काहीजण, ज्या अंतर्वस्त्राने नवीन वर्षाचे स्वागत करतात ते फेकून देतात. यामागे जुन्या कडून नव्या दिशेने जाण्याचा मार्ग सूचित केला जातो. तर काहीजण वर्षाच्या सुरुवातीला अशुभाची चाहूल टाळण्यासाठी ही परंपरा साजरी करतात, असे सांगितले जाते. लाल रंग प्रेम, प्रजननाशी संबंधित असल्याने ही प्रथा अस्तित्त्वात आल्याचे काही मानतात. केवळ अंतर्वस्त्रंच नाही तर काही जण जुन्या वस्तू फेकून नवीन वर्षाचे स्वागत करतात. प्राचीन काळी जुन्या वस्तू खिडकीतून फेकून हा विधी पार पाडला जात असे. ही प्रथा विशेषत: दक्षिण इटलीत लोकप्रिय होती, परंतु आज ती पूर्वीपेक्षा खूपच कमी पाळली जाते.

नवीन वर्ष आणि संपत्तीचे प्रतीक मसूर

इटली हा देश त्याच्या खाद्य संस्कृतीसाठीही ओळखला जातो, ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी, cotechino (डुकराचे मांस: सॉसेज) आणि zampone (डुकराचे ट्रॉटर) दोन आवश्यक क्लासिक पदार्थ तयार करण्यात येतात. कोटेचिनो हा उत्तर इटलीमधील एक विशिष्ट पदार्थ आहे, हा पदार्थ मोडेना येथील एका PGI समूहाचा पदार्थ आहे. परंतु आज तो संपूर्ण देशात आवर्जून खाल्ला जातो, विशेषत: सणासुदीच्या काळात याचे सेवन अधिक होते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोटेचिनो खाण्याची परंपरा आहे. कोटेचिनो हे डुक्करापासून तयार केलेले फॅटी सॉसेज आहे, जे इटालियन परंपरेनुसार विपुलता, प्रजनन आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. याशिवाय मसूर देखील या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मसूर नशीब आणतात अशी इटालियन लोकांची श्रद्धा असल्याने इटालियन कुटुंबांमध्ये जेवणाच्या शेवटी, मध्यरात्रीच्या वेळी खाण्यासाठी मसूर वाढण्याची प्रथा आहे, तर काहीजण मसूर साइड डिश म्हणून खातात. या प्रथेची पाळेमुळेही रोमन साम्राज्यात आढळतात. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रोमन नागरिक एका चामड्याच्या पिशवीत मसूर ठेवत, हे मसूर कालांतराने नाण्यांमध्ये बदलतील असा त्यांचा विश्वास होता…

अधिक वाचा: ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल?

पवित्र डाळिंब

केवळ मसूरच नाही तर नवीन वर्षाचे स्वागत डाळिंबानेही केले जाते. इटालियन संस्कृतीत डाळिंब हे पवित्र मानले जाते. प्राचीन काळी डाळिंब हे संपत्ती आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक होते. बायबलमध्येही डाळिंबाचा उल्लेख आहे. या उल्लेखानुसार इजिप्तमधून निर्वासितांना वचन दिलेल्या देशात सापडतील अशा फळांपैकी एक म्हणून या फळाचा उल्लेख येतो. इतकेच नाही तर देवाच्या भेटवस्तूंचे प्रतीक म्हणून अनेक पवित्र चित्रांमध्ये हे फळ दिसते. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर डाळिंबाचे रोप भेट देणे किंवा घरी आणणे हे शुद्ध मानले जाते. डाळिंबाचा संबंध कदाचित लाल रंगाशी असल्यानेही ते पवित्र मानले जात असावे असे काही तज्ज्ञ सांगतात.

केवळ डाळिंबच नाही तर ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या शेवटच्या काही मिनिटांत द्राक्षे खाण्याची प्रथाही स्थानिक परंपरांशी जोडलेली आहे. ही मूलतः एक प्राचीन स्पॅनिश प्रथा आहे. मसूर आणि डाळिंबाप्रमाणे, द्राक्षंदेखील संपत्तीचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे वर्षभर सुख, समृद्धी नांदण्यासाठी द्राक्षाचे सेवन केले जाते. यांसारख्या प्रथा स्पेन आणि चीन मध्येही आढळतात.