Worlds Largest Station : तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात मोठा रेल्वे स्टेशन कुठे आहे? जर नाही, तर तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की, हा स्टेशन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चिन आणि भारतात नाही, तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनचा पुरस्कार ग्रॅंड सेंट्रल टर्मिनलच्या नावावर आहे. हा स्टेशन वर्ष १९०१ ते १९०३ मध्ये बांधण्यात आला होता. हा स्टेशन बांधण्यामागे एक जबरदस्त किस्सा असा आहे की, या स्टेशनला त्या काळात पेंसिल्वेनियाच्या रेलरोड स्टेशनशी स्पर्धा करण्यासाठी डिझाईन करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनच्या या गोष्टींबाबत लोकांना माहित नाही

या रेल्वे स्टेशनचं बांधकाम अशा काळात करण्यात आलं, ज्यावेळी खूप मोठ्या मशिन्स उपलब्ध नव्हत्या. या सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनला बांधण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागला होता. अमेरिका मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, हा रेल्वे स्टेशन एव्हढा मोठा आहे की, याला बांधण्यासाठी दररोज १० हजार माणसं एकत्र काम करत होते. हा स्टेशन सर्वात मोठा स्टेशन म्हणून ओळखला जातोच पण या वास्तुकला आणि डिझाईन या स्टेशनची खासीयत आहे.

नक्की वाचा – सापांचे कान दिसत नाहीत, मग सापांना ऐकायला येतं का? यामागंच सत्य जाणून तुम्हीही थक्क व्हाल

इथे थांबू शकतात एकाच वेळी ४४ ट्रेन

या स्टेशनवर एकूण ४४ प्लॅटफॉर्म बनवण्यात आले आहेत. एकाच वेळी ४४ ट्रेन या स्टेशनवर थांबू शकतात. तसेच ग्रॅंड सेंट्रल टर्मिनलवर अनेक चित्रपटांचे चित्रिकरणही करण्यात आलं आहे.

इंडियन रेल्वेबाबत इंटरेस्टिंग फॅक्ट

भारतातील सर्वात मोठ्या जंक्शनचा पुरस्कार उत्तर प्रदेशच्या मथुराच्या नावावर आहे. जंक्शन अशा स्टेशनला म्हणतात, ज्या ठिकाणाहून कमीत कमी तीन रेल्वे मार्ग जात असतील. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर रेल्वे स्टेशनवर जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. याआधी हा विक्रम खडगपूर स्टेशनच्या नावावर होता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New york grand central terminal is the world largest railway station more than 40 trains can stand at the same time on this station nss