Why OK Written Behind the Truck: दळणवळणाच्या साधनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे ट्रक किंवा तशीच मालवाहू वाहने. ट्रकच्या मागच्या पाट्या हा देखील एक चर्चेचा विषय ठरतो. कारण त्या अत्यंत खास पद्धतीने लिहिलेला असतात. असाच एक शब्द ट्रकच्या मागे सर्रास दिसतो. तो असतो OK. (Why Ok Written Behind the Truck?) OK लिहिलेलं (OK History) नाही असा ट्रक किंवा मालवाहू वाहन सापडणं हे तसं विरळच. याचा अर्थ किंवा यामागचा नेमका किस्सा काय? हे तुम्हाला माहीत आहे का? ओकेचा इतिहास काय? (What is the History Behind OK?)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरं महायुद्ध आणि OK लिहिण्याची प्रथा (Second World War And Connection Of OK)

ट्रकच्या मागे OK लिहिलं जातं याची प्रामुख्याने दोन कारणं आहेत. पहिल्या कारणामागे तर चक्क दुसरं महायुद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर १९३९ ते सप्टेंबर १९४५ या कालावधीत जगभरात डिझेलचा तुटवडा भासू लागला. या तुटवड्याममुळे वाहनं केरोसीन अर्थात रॉकेलवर चालवण्यात येऊ लागली. केरोसीनकडे त्या काळात डिझेलचा पर्याय म्हणून पाहिलं गेलं.

हे पण वाचा- भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य काय? सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता? मुंबई लोकल जेव्हा ठाण्यात… ‘या’ १० प्रश्नांची उत्तरे माहितच हवीत

OK हा शब्द वाहनांच्या मागे का लिहिला जातो त्याचं कारण काय आहे?

OK लिहिण्यामागचा अर्थ काय? (What is The Reason Behind Writing OK ? )

केरोसीनवर चालणाऱ्या या वाहनांचा एक तोटाही होता. डिझेलच्या तुलनेत केरोसीन हे लवकर पेट घेतं किंवा अधिक ज्वलनशील असतं. त्यामुळे रस्त्यावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी मालवाहू ट्रक किंवा वाहनांमागे OK म्हणजेच ON Kerosene हे लिहिण्याची पद्धत सुरु झाली. जेणेकरुन या वाहनाच्या मागे असणाऱ्या वाहनांना आपल्या समोरचं वाहन हे केरोसीनवर चालतं आहे याची जाणीव व्हावी. हे जसं कारण महत्त्वाचं आहे तसंच यामागचं दुसरं कारणही महत्त्वाचं आणि रंजक आहे. त्या कारणामागे आहे दस्तुरखुद्द टाटा कंपनी.

टाटाच्या ओके साबणाचं खास प्रमोशन करण्याची शक्कल (TATA Soap and OK Connection)

टाटा कंपनीने OK हा साबण आणला होता. त्या काळात जाहिराती आणि त्या उत्पादनाचा प्रचार या गोष्टीला मर्यादा होत्या. त्यामुळे ओके वाहनांवर लिहण्यात आलं. त्यावर एक छानसं कमळही काढण्यात आलं. कारण तो टाटा साबणाचा लोगो होता. टाटाचा ओके धुलाईचा साबण ही जाहिरातही त्या काळात प्रसिद्ध झाली होती. टाटा कंपनीने लढवलेली ही शक्कल अनेकांना आवडली. त्यामुळे भारतात ट्रक घेतला गेला की त्यामागे कमळ काढणं आणि OK लिहिणं ही जणू काही प्रथाच बनून गेली. जी अद्यापही कायम आहे. Horn OK Please असंही त्याबरोबर लिहिलं जाऊ लागलं. त्यामुळे OK वाहनांमागे आलं आणि वाहनांवरच्या नंबर प्लेट इतकाच महत्त्वाचा भाग झालं.

ओके शब्द लिहिण्यामागे टाटा कंपनी कशी जबाबदार? याचंही एक खास कारण आहे.

OK नावाची कंपनी टाटांनी खरेदी केली होती

१९१७ ते १९१८ च्या दरम्यान जमशेदजी टाटा यांनी OK कोकोनट मिल्स विकत घेतली. यानंतर या ठिकाणी OK या खोबरेल तेलासह साबणाची निर्मितीही होऊ लागली. या कंपनीचं नाव ओकेऐवजी TOMCO असं ठेवण्यात आलं आहे. OK धुलाई साबण हा या नव्या कंपनीचं उत्पादन होता. धुलाईच्या साबणासह OK लोटस या अंघोळीच्या साबणाचीही निर्मिती करण्यात आली. त्या काळी युनिलिव्हरच्या लाईफबॉय या जगात प्रसिद्ध असलेल्या कंपनीला या ब्रांडने टक्कर दिली होती. ScoopWhoop ने वृत्त दिलं आहे. तसंच काय आणि कसं काय? या फेसबुक पेजवरही ही माहिती उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: News about ok word history and reason behind why its written on truck back side scj
Show comments