Toll Tax Receipt : तुम्ही महामार्गावरून प्रवास करता तेव्हा तुम्हाला अनेक टोलनाक्यावर टॅक्स भरावा लागतो. महामार्गावरील प्रवास सुखकर होण्यासाठी हा टोल आकारला जातो. टोल भरल्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचारी तुम्हाला पैसे भरल्याची पावती देतात. अनेक जण ही पावती निरुपयोगी समजून फेकून देतात. तुम्हीदेखील असे करीत असाल तर आजच थांबा? कारण महामार्गावर प्रवास करताना अडचणी आल्यास ही पावती तुमच्या उपयोगी पडू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळतात ‘या’ सुविधा…

महामार्गावर प्रवास करेपर्यंत टोलनाक्यावर टोल भरल्यानंतर मिळणारी पावती तुम्ही सुरक्षित ठेवली पाहिजे. या पावतीच्या समोर आणि मागे चार वेगवेगळे फोन नंबर लिहिलेले असतात. हे फोन नंबर हेल्पलाइन, रुग्णवाहिका सेवा, क्रेन सेवा आणि पेट्रोलसेवा यांचे असतात. हे क्रमांक NHAI या वेबसाइटवरही सहज उपलब्ध असतात. पण अनेकदा प्रवासादरम्यान नेटवर्क नसते. अशा वेळी टोल पावतीवरील फोन नंबर उपयोगी पडतात.

लगेल मिळवता येते मदत!

या सर्व हेल्पलाइन नंबरवर तुमच्या कॉलला लगेच उत्तर दिले जाते. तुम्हाला प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही NHAI हेल्पलाइन नंबर १०३३ किंवा १०८ वर कॉल करू शकता.

मेडिकल इमर्जन्सी नंबर

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी आली तर तुम्ही टोल पावतीच्या मागील बाजूस नमूद केलेल्या मेडिकल इमर्जन्सी क्रमांकावर कॉल करू शकता. कॉल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत रुग्णवाहिका तुमच्यापर्यंत पोहोचेल. NHAI च्या रुग्णवाहिका हेल्पलाइन क्रमांक 8577051000 आणि 7237999911 आहेत. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

पेट्रोल हेल्पलाइन नंबर

महामार्गावर अचानक गाडीतील पेट्रोल किंवा डिझेल संपले तर तुम्ही पेट्रोल हेल्पलाइन नंबरवर कॉल करून पेट्रोल मागू शकता. NHAI तुम्हाला ५ ते १० लिटर पेट्रोल पुरवते, पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. 8577051000, 7237999944 हे पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही NHAI च्या वेबसाइटला भेट देऊ शकता. ज्यात तुम्हाला महामार्गावरून प्रवास करताना कोणत्या सेवासुविधा मिळतात याची माहिती मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nhat toll tax receipt benifits of toll tax receipt while traveling on national highway these services are free sjr