विमानातून प्रवास करत असताना स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरानं पत्रकार अर्णब गोस्वामी यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावर आक्षेप घेत चार विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानातून प्रवास करण्यावर कुणाल कामरावर बंदी घातली आहे. विमान कंपन्यांनी त्याच्यावर ‘नो फ्लाय लिस्ट’ नियमानुसार कारवाई केली. यात विमान कंपन्यांबरोबरच प्रवाशांना संरक्षण देणारेही काही नियम आहेत.
प्रवासादरम्यान अनेक प्रवाशी विमानात गोंधळ घालतात. विशेषतः विमानातील कर्मचाऱ्यांशी वाद होतात. काही महिन्यांपूर्वीच खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनीही विमानात कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. अशा घटना वारंवार होत असल्यानं काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे नो फ्लाय लिस्ट होय.
एअर इंडिया काय म्हणाली?
कुणाल कामरावर बंदी घालताना ‘एअर इंडिया’नं नो फ्लाय लिस्ट नियमाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. प्रवासादरम्यान दुसऱ्या प्रवाशांनी केलेल्या गैरवर्तणुकीचं कारण एअर इंडियानं दिलं आहे. त्यानुसार कुणाल कामरावर अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली आहे.
‘नो फ्लाय लिस्ट’ची गरज का पडली –
मार्च २०१७ मध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यानं विमानातील कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. सीटच्या कारणावरून हा वाद झाला होता. तर मागील वर्षी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनीही एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती . सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली. त्यानंतर सरकारने हवाई प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये एक नवीन नियमाचा समावेश केला, तो म्हणजे No fly list. प्रवाशांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीमुळे हा नियम करण्यात आला.
नियम काय सांगतो?
विमानात एखाद्या प्रवाशांने चुकीचं अथवा गैरवर्तन केलं, त्याची दखल विमानातील पायलट-इन-कमांड घेतो. त्यानंतर त्या विमान कंपनी यासाठी एक समिती नेमते. समितीला ३० दिवसांच्या आत तक्रारीची दखल घ्यावी लागते. जर बंदी घालायची असेल, तर किती दिवसांसाठी हवी हे समितीला ठरवावे लागते.
गैरवर्तणुकीचे तीन प्रकार?
- एखाद्या प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशासोबत शाब्दिकरित्या गैरवर्तणुक केली, तर त्या प्रवाशावर तीन महिन्यांसाठी विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली जाते.
- जर प्रवाशाकडून शारीरिक आक्षेपार्ह वर्तन झाले असेल, तर त्यावर सहा महिन्यासाठी बंदी आणली जाते.
- प्रवाशाने एखाद्याच्या जिवास धोका निर्माण होईल असं कृत्य केलं, त्यांच्यावर किमान दोन वर्षासाठी बंदी घातली जाते.
प्रवाशालाही आहेत अधिकार-
‘नो फ्लाय लिस्ट’नुसार बंदी घातल्यानंतर प्रवासी याविरोधात दाद मागू शकतो. प्रवासी हवाई प्रवास बंदी आणल्यानंतर ६० दिवसांच्या समितीकडे अपील करू शकतो. प्रवाशाची बाजू ऐकून घेतल्यानंतर बंदीच्या निर्णयावर समिती पुनर्विचार करू शक