Chandrayaan-3 Launch : भारताने २०१९ मध्ये चांद्रयान-२ मोहिम राबवली होती. परंतु, या मोहिमेत अपयश आल्याने पुन्हा चंद्रावर स्वार होण्यासाठी श्रीहरीकोटा येथील तळावरून चांद्रयान-३ दुपारी २.३५ वाजता लॉन्च करण्यात आलं. हे चांद्रयान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सतधीश धवन स्पेस सेंटरमधून हे चांद्रयान अवकाशात झेपावले. परंतु, अनेकांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, १९७२ पासून आतापर्यंत चंद्रावर कुणीच का जाऊ शकलं नाही, काय आहेत यामागची कारणे, जाणू घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
याआधी दोनदा प्रयत्न करण्यात आले
भारताने चांद्रयान-१ ला २२ ऑक्टोबर २००८ ला लॉन्च केलं होतं. तर १४ नोव्हेंबर २००८ ला जेव्हा चांद्रयान-१ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या सीमेजवळ पोहोचला तेव्हा त्याला अपघात झाला. त्यानंतर २२ जुलै २०१९ ला दुसरा प्रयत्न करण्यात आला. परंतु, २ सप्टेंबर २०१९ ला चांद्रयान-२ चंद्रमाच्या ध्रुवीय कक्षेत चंद्राला फेऱ्या मारत असताना लॅंडर विक्रमपासून वेगळा झाला. मात्र, चंद्राच्या कक्षेतून जेव्हा तो २.१ किमीच्या अंतरावर होता, तेव्हा त्याचा जमिनीवर असलेल्या स्टेशनचा संपर्क तुटला होता.
नक्की वाचा – Chandrayaan- 3 : ‘लूना-२ आणि अपोलो’…’हे’ होते आतापर्यंतचे सर्वात मोठे १० ‘Moon Mission’
१९७२ नंतर चंद्रावर कुणीच का गेलं नाही?
२१ जुलै १९६९ या तारखेला पहिल्यांदाच माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. या महान व्यक्तीचं नाव शास्त्रज्ञ नील आर्मस्ट्रॉन्ग आहे. त्यानंतर १९७२ ला यूजीन सेरनन चंद्रावर गेले होते. यूजीन शेवटचे व्यक्ती होते, जे चंद्रावर गेले होते. त्यानंतर आजपर्यंत कोणताही माणूस चंद्रावर गेला नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. कोणत्याही देशाने त्यानंतर कुणालाही चंद्रावर का पाठवलं नाही? जाणून घ्या यामागचं कारण.
सर्व खेळ पैशांचा
चंद्रावर १९७२ नंतर कोणालाही न पाठवण्याचं कारण म्हणजे पैसा आहे. लॉस एंजेलिसच्या कॅलिफॉर्निया यूनिवर्सिटीतील खगोलशास्त्राचे प्रोफेसर मायकल रिच यांनी बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, चंद्रावरील मानव मोहिमेसाठी खूप खर्च आला होता. तसंच याचा वैज्ञानिकदृष्ट्या फायदाही कमीच झाला.
२००४ मध्ये अमेरिकेनं पुन्हा एकदा चंद्रावर मानव मोहिमेचा प्रयत्न केला होता. यासाठी माजी राष्ट्रपती डब्ल्यू जॉर्ज बुशने प्रस्ताव दिला होता. यासाठी १०४,००० मिलियन अमेरिकन डॉलरचं अनुमानित बजेट बनवलं होतं. त्यामुळे आर्थिक गोष्टींचा विचार करता हा प्रोजेक्ट पुढे सुरु केला नाही.