महाभारत महाकाव्य असले तरी हे काव्य भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. महाभारताच्या युद्धाची कारणमीमांसा नेहमी धर्म-अधर्म, कर्म, नीतिमत्ता यांसारख्या मूल्यांच्या आधारे केली जाते. महाभारतातील लढा सत्य-असत्य यांच्यातील संघर्ष असल्याचे कथांच्या माध्यमातून व्यक्त केले जाते. या युद्धातील दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे पांडव आणि कौरव. पांडवांची बाजू सत्याची होती, तर कौरवांची बाजू असत्याची. याच पार्श्वभूमीवर पांडव आणि कौरव हा लढा झाला, असे पारंपरिक कथांच्या माध्यमातून सांगितले जाते. हे परंपरागत चालत आलेले सत्य असले तरी संगीथ व्हर्गीस आणि झॅक संगीथ या दोन अभ्यासकांनी महाभारताच्या युद्धाच्या संदर्भात एक नवीन संशोधन पेंग्विन इंडिया प्रकाशनाच्या ‘हिडन हिस्ट्रीज’ या पुस्तकात मांडले आहे. यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण लेख नुकताच ‘द प्रिंट’ या वृत्त-संकेतस्थळावर प्रकशित करण्यात आला. त्यानिमित्ताने या नवीन संशोधनानुसार महाभारताचे युद्ध नेमके कोणामुळे झाले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा