फोनपे हे लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. यावर युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवीन फीचर लाँच केले जातात. अशाच एका फीचरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे, या फीचरचा वापर करून एटीएमकार्डशिवायही आधारकार्डचा वापर करून डिजिटल पेमेंट करता येणार आहे. आधारकार्डद्वारे पेमेंट करता येणारी फोनपे ही पहिली थर्ड पार्टी एप्लीकेशन प्रोव्हायडर कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आधारकार्डचे शेवटच्या सहा नंबरद्वारे युजर्सना युपीआय पेमेंट करता येईल. या प्रक्रियेच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.

आणखी वाचा : तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्डची नोंद आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून लगेच जाणून घ्या

फोनपेमध्ये आधारकार्डद्वारे युपीआय अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • फोनपे अ‍ॅप उघडा
  • प्रोफाइल पेज पर्यायावर जा
  • पेमेंट इंस्ट्रूमेंट टॅबवर क्लिक करा
  • अ‍ॅड बँक अकाउंट पर्याय निवडा, त्यातील तुमच्या बँकचा पर्याय निवडा
  • व्हेरिफाय पर्यायावर क्लिक करा, ओटीपी सबमिट करा
  • युपीआय सेटअप सेक्शनमध्ये जा
  • आधारकार्ड पर्यायावर क्लिक करा
  • आधारकार्ड नंबरमधील शेवटचे सहा अंक टाका
  • पुन्हा ओटीपी सबमिट करा, तुमची युपीआय सेटअप प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अशाप्रकारे तुम्ही आधारकार्डचा वापर करून फोनपेवर युपीआय पेमेंट करू शकता.

Story img Loader