NPS Calculator : राष्ट्रीय निवृत्ती योजनेमार्फत (National Pension Scheme – NPS) खासगी क्षेत्रातील कर्मचाऱी त्यांच्या सेवानिवृत्तीची योजना आखू शकतात. नोकरीला लागल्यानंतर वेळेत आणि हुशारीने या योजनेत पैसे गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला लाखो रुपये निवृत्तीवेतन म्हणून मिळू शकतात. अर्थात तुमची पेन्शन तुम्ही निवडलेल्या ॲन्युइटी स्कीमवर आणि कालांतराने मिळवलेल्या परताव्यावर अवलंबून असते. निवृत्तीनंतर मासिक दीड लाख रुपये पेन्शन मिळावी म्हणून वयाच्या पंचविशीपासून कशी गुंतवणूक करावी हे आपण यामाध्यमातून जाणून घेऊयात.

‘एनपीएस’मध्ये गुंतवणूक टियर १ आणि टियर २ मध्ये करता येते. टियर १ मधील गुंतवणूक कर कार्यक्षम असते. पण टियर २ मधील गुंतवणूक ही कर कार्यक्षम नाहीये. टियर १ च्या खात्यामध्ये दर वर्षी किमान १,००० रुपये गुंतवावे लागतात. टियर २ चं खातं उघडायचं असेल तर टियर १ उघडावंच लागतं. या खात्याला कोणतीही वार्षिक योगदानाची मर्यादा नाहीये. यातील पैसे कधीही आणि कितीही काढता येतात. गुंतवणूकदाराला भांडवली कर मात्र भरावा लागतो. टियर २ मधील पैसे टियर १ मध्ये वळवता येतात.

India GDP growth rate slows down freepik
India GDP Rate : भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण; जीडीपी अवघा ६.७ टक्क्यांवर, गेल्या पाच तिमाहीतला सर्वात कमी दर
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Goldman Sachs gold prediction
Goldman Sachs about Gold: सोन्यात गुंतवणूक करावी का? ‘गोल्डमन सॅक्स’ म्हणतं ‘Go for it’, कारण…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?

निवृत्तीनंतर दीड लाख रुपये मासिक मिळवण्यासाठी कशी गुंतवणूक कराल (NPS investment for a Rs 1.5 lakh monthly pension)

  • तुम्हाला दर महिन्याला सहा हजार रुपये गुंतवावे लागतील. १२ टक्के अपेक्षित वार्षिक परतावा गृहित धरल्यास तुमची गुंतवणूक लक्षणीय वाढत जाईल.
  • ३५ वर्षांनी म्हणजेच तुमच्या वयाच्या साठीपर्यंत या गुंतवणुकीची रक्कम २५ लाख २० हजारापर्यंत जाईल. तर, निवृत्त होईपयंत तुमचा एकूण कॉर्पस अंदाजे ६.७४ कोटी होईल.
  • एकूण निधीपैकी सुमारे २.७ कोटी रुपये तुम्ही वार्षिक काढू शकता. तर, ४.०४ कोटी रुपये एक-रकमीही काढता येऊ शकतील. या गुंतवणूक धोरणासह तुम्हाला अंदाजे १.४८ लाख मासिक पेन्शनही मिळू शकतं.

NPS मधून कशी रक्कम काढता येते?

वयाच्या ६० व्या वर्षी टियर १ मधून ६० टक्के रक्कम काढता येते. त्याच्यावर कर लागत नाही. उरलेल्या ४० टक्के रकमेनुसार निवृत्तिवेतन घ्यावे लागते. या निवृत्तिवेतनावर मात्र करदात्याच्या उत्पन्न श्रेणीनुसार कर भरावा लागतो. जमा रक्कम जर ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर ती पूर्णपणे काढता येते. वयाच्या ६० व्या वर्षाआधी जर ‘एनपीएस’ बंद करायचं असेल त्यासाठी वेगळे नियम आहेत. इथे २० टक्के पैसे काढून, बाकी ८० टक्के रक्कम निवृत्तिवेतनाच्या माध्यमातून घ्यावी लागते. खातं उघडल्यानंतर ५ वर्षांनी असं करता येतं. परंतु जर जमा रक्कम २.५ लाख असेल, तर सगळेच पैसे काढता येतात.

हेही वाचा >> मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

खातं चालू असताना रक्कम काढता येते का?

जर ‘एनपीएस’च्या गुंतवणूकदाराचं निधन झालं, (६०च्या आधी किंवा नंतर) तर त्याच्या खात्यात जमा असलेली रक्कम पूर्णपणे त्याच्या नामनिर्देशकाला (नॉमिनी) मिळते. खातं चालू असताना काही विशिष्ट कारणांसाठी २५ टक्के रक्कम काढता येते, जसं की, मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, आजारपण किंवा घरासाठी. असं मात्र तीनदाच करता येतं. तेव्हा गुंतवणूकदारांनी पैशांची सोय करताना याबाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे.