What is NPS Vatsalya Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४ चा अर्थसंकल्प मांडताना एनपीएस वात्सल्य या नव्या योजनेची घोषणा केली होती. १८ सप्टेंबर २०२४ पासून ही योजना देशभरात सुरू करण्यात आली आहे. पालक आणि मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. या योजनेअंतर्गत आई-वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैशांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत फ्लेक्सिबल काँट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे.

ही एकप्रकारे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, यात गुंतवणूकदार म्हणजेच पालकांना १८ वर्षांखालील मुलगा आणि मुलीसाठी त्यांच्या नावावर गुंतणूक करता येते. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर वात्सल्य एनपीएस खाते नियमित होऊ शकते. शिवाय गुंतवणुकीचे कर बचतीचे फायदे गुंतवणूकदारांना मिळत राहतात.

CIDCO Lottery 2024 Dates in Marathi
CIDCO Lottery 2024 : सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? सर्वकाही वाचा एका क्लिकवर
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
What is hot desk
What is Hot Desk : ऑफिसमध्ये राबवली जाणारी हॉट डेस्क संकल्पना नेमकी काय? याचे फायदे-तोटे काय असू शकतात?
Canara Bank Apprentice Recruitment 2024
कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल तीन हजार जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या अर्जप्रक्रिया
RRC NCR Apprentice Recruitment 2024: Apply for 1679 posts at rrcpryj.org know how to apply
RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
Konkan Railway Recruitment 2024 Registration for 190 posts begins tomorrow konkanrailway.com
Kokan Railway Recruitment : कोकण रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज, ‘इतका’ मिळेल पगार
Sbi recruitment 2024 notification in marathi
SBI Recruitment 2024 : स्टेट बँकेत १५०० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती, पगार ९३ हजार; पण ‘हेच’ उमेदवार करु शकतात अर्ज
amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा

NPS वात्सल्य योजनेसाठी कोण पात्र आहे?

१) वयोमर्यादा : ही योजना अल्पवयीन म्हणजे १८ वर्षांखालील मुलांसाठी आहे .

२) पालक/पालकांचा सहभाग : आई-वडील किंवा कायदेशीर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांचे NPS वात्सल्य खाते उघडू शकतात आणि व्यवस्थापित करू शकतात.

३) भारतीय नागरिक : ही योजना भारतीय नागरिकांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे.

कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

१) पालकाचे ओळख पत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
२) अधिवास प्रमाणपत्र
३) अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा
४) अल्पवयीन मुलाचे ओळखपत्र
५) मोबाइल नंबर
६) ईमेल आयडी
७) फोटो

वात्सल्य योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? (How To Apply NPS Vatsalya Scheme)

१) सर्वप्रथम eNPS पोर्टलवर जा किंवा enps.nsdl.com, nps.kfintech.com या वेबसाइटवर जा.

२) यानंतर नवे अकाउंट ओपन करण्यासाठी “Registration” पर्याय निवडा.

३) आता पॅन नंबर, आधार कार्ड किंवा मोबाइल नंबरसह विचारलेली सर्व माहिती भरा.

४) तुमच्या बँकेकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

५) अर्ज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) दिला जाईल.

६) तुम्हाला किमान १००० रुपयांमध्ये हे खाते सुरू करता येते.

हेही वाचा – CIDCO Lottery 2024 : सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? सर्वकाही वाचा एका क्लिकवर

एनपीएस वात्सल्य कॅल्क्युलेटर (NPS Vatsalya Calculator)

या योजनेअंतर्गत जर पालकांनी मुलांच्या नावे १८ वर्षांसाठी दर वर्षाला १०,००० रुपये भरले, तर या कालावधीच्या अखेरीस १० टक्क्यांच्या अपेक्षित परताव्याच्या दराने (ROR) गुंतवणूक अंदाजे पाच लाख इतकी होईल असा अंदाज आहे. जर गुंतवणूकदार वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करत राहिल्यास, वेगवेगळ्या परताव्याच्या दरांवर अवलंबून अपेक्षित रक्कम लक्षणीयरीत्या बदलू शकते. १० टक्के RoR वर, कॉर्पस सुमारे २.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.