NPS Vatsalya Scheme Plan : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा केली. निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेली योजना १८ सप्टेंबर (बुधवार) पासून सुरु होते आहे. या योजनेचं पोर्टल १८ सप्टेंबरला लाँच केलं जाणार आहे. काय आहे ही खास योजना आपण जाणून घेऊ.

एनपीएस वात्सल्य योजना नेमकी काय आहे? (NPS Vatsalya Scheme)

एनपीएस योजनेच्या अंतर्गत आई वडिलांना त्यांच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे. पालक त्यांच्या मुलांसाठी या योजनेच्या खात्याद्वारे बचत करुन मुलांसाठी भविष्यात उपयोग होईल अशा आर्थिक निधीची तरतूद करु शकणार आहेत. या योजनेत फ्लेक्सिबल काँट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे.

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

एनपीएस योजनेमुळे मुलांचं भवितव्य होणार सुरक्षित

एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) योजनेमुळे मुलांचं भविष्य आणि भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होणार आहे. एनपीएस वात्सल्य योजना पेश्न फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) च्या अंतर्गत चालवणी जाणार आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सगळ्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्दीष्टाने ही योजना सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

हे पण वाचा- Nirmala Sitharaman Saree : पानांची बुट्टी, सुवर्ण किनार; निर्मला सीतारमण यांच्या ‘टसर सिल्क’ निळ्या साडीची चर्चा

एनपीएस वात्सल्य योजनेत कुणाला गुंतवणूक करता येणार?

एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) योजनेनंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खात्यांमध्ये पैसे जमा करु शकणार आहेत. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलांच्या नावे हस्तांतरित करता येणार आहे. १८ ते ७० वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरीकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

एनपीएस वात्सल्य योजनेचे फायदे काय?

चक्रवाढ व्याजाचा लाभ घेऊन कालांतराने भरीव वाढ होईल

मूल निवृत्त होईपर्यंत त्याच्याकडे मोठा निवृत्ती निधी असेल

लहान वयातच मुलांसाठी गुंतवणूक केल्याने त्यांना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करता येईल.

मूल १८ वर्षांचं झाल्यानंतर त्याच्या नावे खातं करता येईल. हे या योजनेचे प्रमुख फायदे आहेत.

एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल. मात्र या योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण ७५ ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तसेच अन्य माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशभरातील लोक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमस्थळी योजनेच्या अल्पवयीन सबस्क्रायबर्सना पीआरएएन मेंबरशिप दिली जाणार आहे.