Best Places To Visit near Mumbai During Monsoon : पावसाळ्यात महाराष्ट्राचे सौंदर्य पाहण्यासाठी परराज्यातून लोक मुंबईत येत असतात. पण वीकेंडला मुंबईकरच मात्र आपापल्या घरी बसलेले असतात, हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. कारण मुंबईतील अनेक ठिकाणं पर्यटकांनी भरलेली असतात, अशावेळी गर्दीच्या ठिकाणी जाणे अनेकजण टाळतात. अशावेळी तुम्ही वीकेंडला कुटुंबियांसह फिरण्यासाठी मुंबईजवळील ऑफबीट ठिकाणं शोधत असाल तर आम्ही तुम्हाला ५ ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
१) तापोळा
तापोळा हे महाबळेश्वर जवळील पर्यटन स्थळ आहे, एक छोटेस गाव असलेले ठिकाण आता हळूहळू विकसित आहेत आहे. येथे लोकांची फार कमी गर्दी असते. यामुळे शनिवार आणि रविवारी कुटुंब आणि मित्रांसोबत निसर्गाच्या कुशीत शांततेत वेळ घालवण्यासाठी तापोळा हे सर्वोत्तम ठिकाणं आहे. याठिकाणी तुम्ही ट्रेकिंगचा आनंदही घेऊ शकता. हॉटेल्सऐवजी तुम्हाला काही अनुभव घ्यायचा असेल तर तापोळ्यात तंबूंच्या घरात राहण्याची व्यवस्था आहे. तापोळ्यापासून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या बागा दिसतात. यामुळे येथून परतताना स्ट्रॉबेरी घ्यायला विसरु नका.
२) डहाणू
मुंबईच्या गजबजाटापासून दूर शनिवार आणि रविवारची सुट्टी घालवण्यासाठी डहाणू हे सर्वोत्तम ठिकाण आहे. समुद्र किनारा असल्याने डहाणूमध्ये सीफूडही खूप चांगले मिळते. डहाणू बीच किंवा बोर्डी बीच मुंबईतील इतर कोणत्याही बीचपेक्षा खूपच स्वच्छ आणि शांत आहे. संपूर्ण आठवडा आराम करण्यासाठी या लहान शहरातील बीच साइड रिसॉर्टमध्ये मुक्काम बुक करा.
३) फ्लेमिंगो अभयारण्य
जर तुम्ही निसर्ग किंवा प्राणी प्रेमी असाल आणि आजवर कधी फ्लेमिंगो पाहिले नसतील तर तुमच्यासाठी ऐरोलीतील फ्लेमिंगो अभयारण्य बेस्ट ठिकाणं आहे. मुंबईच्या कुठल्याही भागातून ऐरोलीला जाण्यासाठी ट्रेन मिळते. हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून विकसित करण्यात आला आहे. तुम्हाला कुटुंबियांसह फिरण्यासाठी हे बेस्ट ठिकाणं आहे.
४) कास पठार
तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रात फुलांची एक दरी देखील आहे. ही दरी कास पठार म्हणून प्रसिद्ध आहे. दूरवर पसरलेल्या सुंदर फुलांच्या या खोऱ्यात ट्रेक करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. हे एक राखीव जंगल आहे, जिथे तुम्हाला फुलांच्या सुमारे ८५० प्रजाती पाहायला मिळतात. २०१२ मध्ये याला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणूनही मान्यता मिळाली आहे. येथे येण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग करावी लागते.
५) माळशेज घाट
माळशेज घाट तलाव, धबधबे आणि हिरव्यागार जंगलांमुळे हे ठिकाण नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. मुंबईत राहणाऱ्या लोकांचे हे आवडते वीकेंड स्पॉट आहे. यावेळी तिथे गेल्यावर तुम्हाला येथे गुलाबी फ्लेमिंगो देखील दिसतात. निसर्गाच्या कुशीत राहण्याचा अनुभव माळशेज घाटावर मिळेल. विशेषतः पावसाळ्यात हे ठिकाण हिरव्यागार नंदनवनासारखे भासते. पण सुरक्षेच्या दृष्टीने हे ठिकाणं बंद ठेवले जाते. त्यामुळे येथे जाण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. तुम्हाला हरिश्चंद्र किल्ला, माळशेज धबधबा, आजोबा हिलफोर्ट इत्यादी ट्रेकिंगचा उत्तम अनुभव घेता येईल. याठिकाणचे सौंदर्य तुम्हाला सुखद अनुभव देते.