One Day Capital of India: सध्या दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी म्हणून ओळखली जाते. पण इतिहासाची जुनी पाने उलटली तर कळेल की दिल्ली ही नेहमीच राजधानी राहिली नाही. इतिहासाची पानं उलटली तर लक्षात येतं की, मागच्या काळात देशाच्या वेगवेगळ्या राजधान्या झाल्या. अनेक राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात राजधानीचे अस्तित्वच बदलून टाकले. पण तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहीत नसेल की, भारतात इंग्रजांच्या राजवटीत एकदा एका शहराला एका दिवसासाठी देशाची राजधानी बनवण्यात आली होती. त्या शहराचे नाव काय होते माहित आहे का? नसेल तर हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला त्या शहराचे नाव सांगणार आहोत.
केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले ‘हे’ शहर
ब्रिटीशांच्या काळात भारतातील एक शहर हे एका दिवसासाठी देशाची राजधानी बनले होते. हे शहर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सध्या आपण सर्व या शहराला प्रयागराज या नावाने ओळखतो. पण ज्या वेळी हे शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते, त्या काळात हे शहर अलाहाबाद म्हणून ओळखले जात होते. १८५८ मध्ये ब्रिटीश राजवटीत यूपीचे तत्कालीन अलाहाबाद हे एका दिवसासाठी आपल्या देशाची राजधानी बनले होते.
(हे ही वाचा : आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या ‘Police’ या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? जाणून थक्क व्हाल )
एका दिवसासाठी भारताची राजधानी बनण्याचे कारण काय?
आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की असे का? वास्तविक या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा कारभार ब्रिटीश राजेशाहीकडे सोपविला असे म्हटले जाते. त्या काळातील अलाहाबाद ही उत्तर-पश्चिम प्रांतांचीही राजधानी होती. त्यावेळी अलाहाबाद हे ब्रिटीश सैन्याचे तळ असायचे, तिथे त्यांनी खूप काम केले. दिल्लीपूर्वी देशाची राजधानी कलकत्ता असायची. जे १९११ मध्ये इंग्रजांनी दिल्लीत हलवले होते.