OYO नावाचा बोर्ड तुम्ही अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये पाहिला असेल. मोठ्या अक्षरांत लिहिलेलं ओयो आणि त्याचा लोगो यावरून त्याची ओळख लोकांच्या लक्षात राहते. ओयो हे प्रेमी युगुलांसाठी असलेलं हॉटेल आहे, असंही समजलं जातं, पण तसं नाही. खरं तर ओयो ही भारतातील सर्वात मोठ्या स्टार्ट-अप बिझनेसपैकी एक असून त्यांचं नेटवर्क संपूर्ण देशभर पसरलं आहे.

हेही वाचा – वेळ सांगताना वापरल्या जाणाऱ्या AM आणि PM चा फुल फॉर्म माहितेय? जाणून घ्या त्याचे महत्त्व

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
uddhav thackeray
Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
how many candidates announced by Mahavikas aghadi Mahayuti
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती, मविआने आतापर्यंत किती उमेदवार जाहीर केले? ‘इतक्या’ जागांवरील तिढा बाकी, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० तास बाकी!
18 slum rehabilitation schemes objected by the municipality will be cleared
पालिकेने आक्षेप घेतलेल्या १८ झोपु योजनांचा मार्ग मोकळा होणार?
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “कॉपी करुन पास होण्यात…”, अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा टोला
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

OYO ही भारतातील एक मोठी स्टार्ट-अप कंपनी आहे. ओयो हे भारतातील २०० हून अधिक शहरांमध्ये पसरलेले सर्वात मोठे हॉटेल नेटवर्क आहे. रितेश अग्रवाल हे OYO चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी गुरुग्राममध्ये फक्त एका हॉटेलपासून या स्टार्ट-अपची सुरुवात केली होती. सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या ओयोचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? नसेल माहीत तर ही बातमी वाचा.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ नाव कसे मिळाले? काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या

OYO या शब्दाचा फूल फॉर्म On Your Own असा आहे. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी २०१२ मध्ये Oravel Stays नावाने हा स्टार्ट-अप सुरू केला होता. कमी किमतीत व कमी वेळेत लोकांना हॉटेल्स बूक करता यावे, यासाठी रितेश यांनी हा स्टार्टअप सुरू केला होता. त्यांनी २०१३ मध्ये Oravel Stays चे नाव बदलून OYO म्हणजेच ऑन युवर ओन केले. ओयोचे बोर्ड असलेले सगळे हॉटेल्स त्यांच्या मालकीचे नाहीत. OYO अनेक हॉटेल्ससोबत भागीदारी करते आणि हॉटेल तिथे येणाऱ्या पाहुण्यांना दर्जेदार सेवा देत असल्याची खात्री करते. हे पाहुणे OYO प्लॅटफॉर्म किंवा अॅपद्वारे त्यांच्या खोल्या बूक करतात. ओयोवर कमी वेळेत व कमी किमतीत रुम बूक करता येतात. तसेच इथे अविवाहित जोडप्यांना एकत्र थांबता येतं.

ओयो होम्स

ओयो तुम्हाला ‘ओयो होम्स’ नावाची एक सुविधा प्रदान करते. या अंतर्गत तुम्ही एक असे हॉटेल बुक करू शकता जिथे तुम्ही स्वतःचे जेवण बनवून खाऊ शकता. बरेच लोक कामानिमित्त दुसऱ्या शहरात जातात, पण आरोग्याशी संबंधित कारणांमुळे त्यांना बाहेरचं जेवण खायचं नसतं, त्यांच्यासाठी ओयोने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ओयो होममध्ये तुम्हाला खोलीसोबत एक स्वयंपाकघर दिले जाते, जिथे स्वयंपाकासाठी लागणारी सर्व भांडी, इंडक्शन, स्टोव्ह, फ्रीज, वॉटर प्युरिफायर दिले जाते. इथे तुम्ही जेवण बनवण्याचं साहित्य आणून स्वयंपाक करू शकता.

Story img Loader