आपण बऱ्याचदा पाण्याची बाटली विकत घेऊन ते पाणी पितो. १० ते ३०० रुपयांपर्यंतच्या किंमतीत अर्धा ते एक लीटर पाण्याच्या बाटलीची विक्री होते. शुद्ध पाणी मिळावं यासाठी लोक पाणपोईवर, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधलं पाणी न पिता पाण्याच्या बाटलीवर पैसे खर्च करतात. तसेच आपल्या घरात येणारं पाणी शुद्ध असतं का? हा चर्चेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे अनेकजण घरी पाणी शुद्ध करण्याची मशीन जोडून घेतात. अथवा घरी २५ ते ३० लीटरच्या पाण्याच्या मोठ्या बाटल्या मागवतात. अशीच परिस्थिती आपल्या कार्यालयांचीसुद्धा आहे. तिथेही २५ ते ३० लीटरच्या पाण्याच्या मोठ्या बाटल्या मागवल्या जातात. कारण, नदी असो अथवा तलाव किंवा विहिरीतल्या पाण्याची शुद्धतेची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. भारतामध्ये नदी प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळेच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना राबवाव्या लागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुद्ध पाणी मिळावं यासाठी लोक मिनरल वॉटर बॉटल खरेदी करतात. कारण हे बाटलीबंद पाणी शुद्ध असतं असा आपला समज आहे. कारण, वॉटर प्लान्टमध्ये (जलशुद्धीकण प्रकल्प) या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातले अशुद्ध घटक काढून पाणी शुद्ध केलं जातं आणि हेच पाणी बाटलीबंद करून विक्रीसाठी ठेवलं जातं. हे पाणी तुम्ही अनेकदा विकत घेतलं असेल. परंतु, तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की, या पाण्याच्या बाटल्यांची झाकणं वेगवेगळ्या रंगांची असतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटलीचं झाकण वेगवेगळ्या रंगाचं असतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की, प्रत्येक कंपनीने आपापला आवडता रंग निवडला असावा. परंतु, हे खरं कारण नाही.

पाण्याच्या बाटल्यांच्या झाकणांच्या रंगामागे काही अर्थ लपलेले आहेत. या बाटल्यांना हिरव्या, निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं झाकण असतं. या झाकणांच्या रंगाचा नेमका अर्थ काय याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत. @aminshaykho या इन्स्टाग्राम हँडलने याबाबतचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार. बाटलीच्या झाकणाचा रंग पांढरा असेल तर ते प्रक्रिया केलेलं पाणी आहे. म्हणजेच ते प्रोसेस्ड वॉटर आहे, असा त्याचा अर्थ होतो.

हे ही वााचा >> ससेमिरा शब्दाचा अर्थ काय? ससा आणि या शब्दाचा काही संबंध आहे का?

बाटलीला काळ्या रंगाचं झाकण लावलेलं असेल तर त्या बाटलीतलं पाणी हे अल्कलाइन आहे. बाटलीचं झाकण निळ्या रंगाचं असेल तर त्याचा अर्थ होतो की त्या बाटलीतलं पाणी हे झऱ्यातलं असून ते शुद्ध केलं आहे. बाटलीचं झाकण हिरव्या रंगाचं असेल तर याचा अर्थ त्या पाण्यात फ्लेवर मिसळून ते शुद्ध केलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी पाण्याची बाटली खरेदी करताना बाटलीच्या झाकणाचा रंग एकदा पाहा.