समुद्रातील प्राण्यांचे जीवन चमत्कारांनी भरलेले असते. कधी कधी असे काही मासे हातात येतात ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. अलीकडे सोशल मीडियावर अशात एका विशिष्ट प्रजातीच्या माशाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा मासा पाहिल्यानंतर अनेकजण हैराण झाले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. या माशाचे दात चक्क माणसासारखे आहेत. जे पाहू आता तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा अनोखा मासा अमेरिकेच्या ओक्लाहोमामधून समोर आला आहे. जिथे एका ११ वर्षाच्या मुलाने तलावातून हा मासा पकडला, पण माशाचे दात पाहून तोही घाबरला, यावेळी मुलासोबत त्याची आईने देखील आश्चर्य व्यक्त केले. आईने म्हटले की, त्यांचा मुलगा चार्ली मासे पकडल्यानंतर जोरजोरात ओरडत होता. सुरुवातीला तिला वाटते की, तो असंच मुद्दाम ओरडतोय, पण जेव्हा तिने मासा पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले.
या माशाचे दात हुबेहुब माणसांसारखे दिसत होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, हा ‘पाकू’ प्रजातीचा मासा आहे. ‘पाकू’ला ‘द बॉल कटर’ असेही म्हणतात. या माशाला आता पुन्हा पाण्यात सोडण्यात आले. याआधीही अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एक मासा आढळला होता. एक व्यक्ती समुद्रात मासेमारी करत होती तेव्हा त्याच्या हातात असा विचित्र मासा मिळाला, ज्याला पाहून तो स्वतःही थक्क झाला होता.
त्यावेळी पकडलेल्या माशालाही हुबेहूब माणसासारखे दात होते. अमेरिकेतील पिरान्हाजवळ ही प्रजाती मुबलक प्रमाणात आढळते, असे म्हटले जाते. काही लोक या विदेशी माशांना कीटकांचा नाश करण्यासाठी पाळतात पण नंतर ते मोठे झाल्यानंतर शेजारच्या तलावांमध्ये आणि नाल्यांमध्ये सोडतात, ज्यामुळे ते अनेकदा अमेरिकेतील गोड्या पाण्याच्या तलावांमध्येही दिसतात.