PAN 2.0 Apply Online:  पॅन 2.0 च्या माध्यमातून केंद्र सरकार आता जुन्या पॅन कार्डच्या जागी नवीन पॅन कार्ड सादर करणार आहे. असे असले तरी तुमचा जुना पॅनदेखील वैध राहील. पण, नवीन पॅन कार्डमध्ये तुम्हाला QR कोडची सुविधा मिळणार आहे. तुम्ही हे नवीन QR कोड असलेले पॅन कार्ड तुमच्या ईमेल आयडीवर विनामूल्य मिळवू शकता. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पण, तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवे असल्यास शुल्क भरावे लागेल. पण, ई-मेल आयडीवर ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस फॉलो करावी लागेल जाणून घेऊ…

ईमेलवर ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आयकर विभागाच्या FAQ नुसार, प्रत्यक्ष पॅन कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराला ५० रुपये निर्धारित शुल्क भरावे लागते. भारताबाहेर पॅन कार्ड डिलिव्हरीसाठी अर्जदाराकडून १५ रुपये + भारतीय टपाल शुल्क आकारले जाईल. PAN 2.0 प्रकल्प अद्याप सुरू व्हायचा असला तरी करदाते आणि व्यक्ती सध्या त्यांच्या ईमेल आयडीवर पॅन मिळवू शकतात. आयकर डेटाबेसमध्ये कोणताही ईमेल आयडी नोंदणीकृत नसल्यास, करदाते PAN 2.0 प्रकल्पांतर्गत इन्कम टॅक्स डेटाबेसमध्ये ईमेल आयडी टाकून विनामूल्य अपडेट करू शकतात.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Shani Margi 2024
Shani Margi 2024 : शनि कुंभ राशीमध्ये मार्गी! ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार धन अन् पैसा
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून

मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

NSDL वेबसाइटवरून पॅन कार्ड मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

१) सर्वप्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या लिंकवर क्लिक करा.

PAN 2.0 Apply Online Step By Step Guide For Your Application in marathi
पॅन २.० ईमेल प्रोसेस मराठी (Photo – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२) वेब पेजवर येताच पॅन, आधार (केवळ व्यक्तीसाठी), जन्मतारीख टाका.

३) आवश्यक माहिती भरल्यानंतर बॉक्स टिक करा आणि सबमिटवर क्लिक करा.

४) तुमच्या स्क्रीनवर एक नवीन वेब पेज ओपन होईल, जिथे तुम्ही आयकर विभागाकडे दिलेली माहिती अपडेटेड आहे की नाही हे तपासा. यानंतर तुम्ही वन टाइम पासवर्ड (OTP) पर्यायावर क्लिक करा.

५) OTP टाका आणि व्हेरिफाय करा. लक्षात ठेवा OTP फक्त १० मिनिटांसाठी वैध असेल.

६) पेमेंट प्रोसेससाठी तुम्हाला सोईचा वाटेल तो पर्याय निवडा. अटींशी सहमत असल्यास तुम्ही Proceed to Payment पर्याय निवडा.

७) देयक रक्कम तपासा आणि ‘Pay Confirm ‘वर क्लिक करा.

८) पेमेंट पूर्ण झाल्यावर, सुरू ठेवा वर क्लिक करा.

९) पेमेंट यशस्वी झाल्यानंतर आयकर डेटाबेसमध्ये अपडेट केलेल्या ईमेल आयडीवर पॅन वितरित केले जाईल.

तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पॅन मिळवण्यासाठी ३० मिनिटे लागू शकतात. तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर पॅन न मिळाल्यास, तुम्ही पेमेंट तपशिलांसह tininfo@proteantech.in वर ईमेल पाठवू शकता. वैकल्पिकरित्या, करदाते त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर 020 – 27218080 किंवा 020 – 27218081 वर कॉल करू शकतात.