Pan Card For Minor: आधार कार्डप्रमाणेच पॅन कार्ड हेही अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार, एखादे सरकारी काम किंवा पैशांचे मोठमोठे व्यवहार, तसेच जन्मतारखेचा वैध पुरावा म्हणूनही पॅन कार्ड तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून एकदा एखादी व्यक्ती १८ वर्षांची झाली की, ते पॅन कार्ड तयार करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, १८ वर्षांखालील तरुणांसाठीही पॅन कार्ड बनवता येते. पण त्यासाठी, केवळ मुलाचे पालक त्यांच्या वतीने अर्ज सादर करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज जमा (सबमिट) केल्यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक प्राप्त होईल, जो तुम्ही तुमच्या वॉर्डच्या पॅन कार्ड अर्जाचे ॲप्लिकेशन करण्यासाठी वापरू शकता. पॅन कार्ड सामान्यत: यशस्वी पडताळणीनंतर १५ दिवसांच्या आतमध्ये तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचते.

तुमच्या अल्पवयीन मुलासाठी पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा… (Pan Card For Minor)

१. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. आवश्यक तिथे माहिती भरा

३. अल्पवयीन मुलाच्या पॅन कार्डसाठी अप्लाय करण्याकरिता योग्य ती कॅटेगरी निवडा.

४. नंतर १०७ रुपये पॅन कार्ड नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क भरा आणि अर्ज जमा (सबमिट) करा.

हेही वाचा….Vande Bharat Ticket Cancellation Charges :वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट रद्द करताय? तिकीट रद्द करताच किती रक्कम घेतली जाते? घ्या जाणून

तुमच्या मुलांच्या पॅन कार्डसाठी अर्ज करताना पुढील कागदपत्रे बरोबर ठेवा…

१. अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा.

२. अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावादेखील आवश्यक आहे.

३. अल्पवयीन व्यक्तीच्या पालकांचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्रसुद्धा चालेल.

आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणी दस्तऐवज किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्रदेखील पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही बरोबर ठेवू शकता.

पॅन कार्ड काढणे का आवश्यक?

बँक खाते, डीमॅट खाते उघडणे, कर्ज घेणे, मालमत्ता खरेदी करणे, बॉण्डमध्ये गुंतवणूक करणे आणि सरकारने देऊ केलेल्या इतर आर्थिक सुविधांसाठीही पॅन कार्ड आवश्यक आहे. तसेच ओळख पुरावा म्हणूनही पॅन कार्ड स्वीकारले जाते. त्यामुळे सगळ्यांनी पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pan card for mino why is a pan card important how to apply and which documents are required know the details asp