How to check PAN Validity: भारतामध्ये १९७२ मध्ये पॅन कार्ड्स या ओळखपत्राची सुरुवात झाली. प्रत्येक भारतीयाकडून हे ओळखपत्र असणे आवश्यक असते. वयवर्ष १८ झाल्यानंतर पॅन कार्ड काढता येते. पॅनचे Permanent Account Number हे विस्तृत रुप आहे. नुकतंच केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या संस्थेने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याविषयी घोषणा केली होती. त्यानुसार आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ असल्याची माहिती समोर आली आहेत. सरकारने आर्थिक व्यवहार करण्याकरीता पॅन कार्ड लिंक करण्याची सक्ती केली आहे.
जर ३१ मार्च पूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही, तर मग पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पॅन कार्ड आधारशी लिंक करता येते. लिंकेज सुरु करण्यासाठी १००० रुपये भरुन पॅन-आधार लिंक करु शकता. लिंक न केल्याने तुमचे पॅन कार्ड अवैध केले जाऊ शकते. पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरता येतात. या ट्रिक्सचा वापर तुम्ही ३१ मार्च २०२३ नंतरही करु शकता.
PAN Card for Child: लहान मुलांचे पॅन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र
पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी ‘हे’ करा
- आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर Tax e-Services हे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
- खाली स्क्रोल करा. PAN subcategory च्याखाली ‘Know your PAN’ हे ऑप्शन दिसेल.
- त्याच्या बाजूला असलेल्या रकान्यातील बाणांवर टॅप करा.
- त्यानंतर पोर्टलवरील ई-फायलिंग लिंकवर क्लिक करा.
- पुढील पेजवर जाण्यासाठी तेथे आवश्यक तपशील भरा.
- तपशील भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यात पॅन कार्डच्या स्थितीबाबतची माहिती दिसेल.