Pani puri different names: भारतातील लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असणारी पाणीपुरी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. पाणीपुरीला जरी तुम्ही गोलगप्पादेखील म्हणत असाल तरी एवढ्याच नावांनी ती प्रसिद्ध नाही बरं का! तिची अजूनही बरीच नावं आहेत, जी भारतातील काना-कोपऱ्यात आपआपल्या वेगळ्या नावानी तसेच चवीने प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाणीपुरी नेमक्या कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे.

पाणीपुरी (महाराष्ट्र)

महाराष्ट्रात पाणीपुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोकप्रिय स्ट्रीट फूडचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे तिखट पाणी, उकडलेले बटाटे आणि सफेद वाटाण्याचा तयार केलेला रगडा. हे सगळं चमचमीत मिश्रण एका पुरीमध्ये देऊन सर्व्ह केलं जातं. तसंच दक्षिण भारतातदेखील या डिशला पाणीपुरीच म्हटलं जातं.

पुचका (पश्चिम बंगाल)

पश्चिम बंगालमध्ये, पाणी पुरीला पुचका म्हणून ओळखले जाते. याची चव एकदम मसालेदार, तिखट असते. याच्या फिलिंगमध्ये विशेषत: मॅश केलेले बटाटे आणि मसालेदार चिंचेचे पाणी असते.

हेही वाचा… रेल्वे तिकिटावरील PNR नंबर म्हणजे काय? यात दडलेली असते प्रवाशांची महत्त्वाची माहिती, जाणून घ्या

गुप-चुप (ओडीशा)

ओडिशामध्ये पाणी पुरीला याला गुप-चुप असं म्हणतात. ओडीशा येथे गुप-चुप तिखट चिंचेच्या पाण्याबरोबर सर्व्ह केले जाते. परंतु त्याची चव इतर प्रदेशातील भागांच्या तुलनेत कमी मसालेदार असते.

पानी के बताशे (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशात पाणी पुरीला ‘पानी के बताशे’ असं म्हणतात. यातलं पाणी तिखट आणि मसालेदार असतं तसच मॅश केलेले सफेद वाटाणे, बटाटे आणि मसाले यात असतात.

हेही वाचा… तमिळनाडूच्या ‘या’ गावात चप्पल किंवा शूज घालण्यास आहे बंदी, गावकरी चालतात अनवाणी; त्यांची श्रद्धा आहे की…

पकौड़ी (गुजरात)

गुजरातमध्ये पकौड़ी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या डिशमध्ये थोडासा फरक आहे.पकौड़ीबरोबर सर्व्ह केलेले त्याचे पाणी थोडे गोड असते आणि बटाटे आणि सफेद वाटाण्याने बनवलेलं स्टफिंग यात असतं.

फुलकी (बिहार)

बिहारमध्ये, पाणी पुरीला फुलकी म्हणून संबोधले जाते. तसंच त्याची चव थोडीफार पुचका सारखीच असते. पण अनेकदा फुलकी मसालेदार किंवा तिखट पाण्याने सर्व्ह केली जाते.

हेही वाचा… स्विमिंग पूलमध्ये निळ्याच टाइल्सचा का होतो वापर? तुम्हाला कधी पडलाय का प्रश्न? मग जाणून घ्या यामागचं खरं कारण

तर पाणीपुरीला हरियाणामध्ये पानी पताशी आणि आसाममध्ये फुस्का/पुस्का असंही म्हटलं जातं.

Story img Loader