दरवर्षी १२ जुलै रोजी सर्वत्र कागदी पिशवी दिवस म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि नैसर्गिक वातावरणास निर्माण होणार्या गंभीर धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्लास्टिकचा कचरा संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. हे प्लास्टिक लवकर नष्ट न झाल्यामुळे पृथ्वीवर याचे ढीग साठायला सुरुवात झाली आहे. केवळ एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिक पिशव्याचे दुष्परिणाम समजून घेणे महत्वाचे आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करा. तसेच काही कारणामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करावा लागल्यास त्या पिशवीला रिसायकल करायला विसरू नकात.
कागदी पिशव्यांचा इतिहास
१८५२ मध्ये अमेरिकन शोधक फ्रान्सिस वोले यांनी प्रथम कागदी पिशवी बनवायची मशीन तयार केली. पुढे १८७१ मध्ये मार्गारेट ई. नाइटने आणखी एक मशीन बनविली जी फ्लॅट-बॉटम कागदी पिशवी तयार करू शकत होती. लोकांकडून तिला चांगलीच पसंती मिळाली आणि ‘किराणा पिशवी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. १८८३ मध्ये चार्ल्स स्टिलवेलने मशीनचा शोध लावला ज्यामुळे चौकोना बॉटम असलेल्या कागदाच्या पिशव्या तयार केल्या जाऊ लागल्या. १९१२ मध्ये वॉल्टर डीबेनरने कागदाच्या पिशव्या अधिक मजबूत करण्यासाठी त्याला हँडल बसवले. वर्षानुवर्षे अनेक प्रयोग होत कागदी पिशव्यांचे उत्पादन सुधारले.
कागदी पिशव्या वापरण्याचे फायदे
१.कागदी पिशव्या वापरणे पर्यावरणपूरक आहे.
२. कागदी पिशव्यांना सहज रिसायकल करता येऊ शकते.
३. कागदी पिशव्या बायोडिग्रेडेबल आहेत त्यामुळे त्या सहज नष्ट होऊ शकतात.
४. कागदी पिशव्या वापरण्यास स्वस्त आहेत.
५. खराब कागदी पिशव्यांचा वापर तुम्ही घरी खत बनवतांनाही करू शकता.
६. कागदी पिशव्या त्यांच्या सुंदर रंगामुळे आणि त्यावरील प्रिंट्समुळे वापरायला जास्त छान वाटतात.