Dudhiya Maldah Mango : आंबा म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा आणि तितकाच आवडीचा विषय. यात जर हापूस असेल तर विचारायची सोय नाही. हापूस आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. पण, भारतात हापूसशिवाय आंब्याच्या इतरही अनेक प्रजाती आहेत. या प्रत्येक प्रजातीला स्वत:ची एक मधुर वेगळी चव आहे. अनेक राज्यांमध्ये आंब्याच्या अशा विविध प्रजातींचे उत्पादन घेतले जाते. कोकणातील हापूस असो वा लखनौचा दसरी त्यांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. यात पाटणाच्या दुधिया मालदाची चवही तितकीच चर्चेत असते. पाटणाच्या दुधिया मालदा आंब्याला स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. आतील दुधासारखा मऊ गर, पातळ साल आणि मधुर चव यासाठी हा आंबा ओळखला जातो. विशेष म्हणजे हा आंबा एकेकाळी पाण्यावर नाही तर चक्क दुधावर पिकवला जात होता.

यामुळे दुधिया मालदा आंब्याकडे वेगळ्या सुगंधामुळे लोक आकर्षित होत होते. आता या आंब्याची चव आता सातासमुद्रापार पोहचली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आंबा खरेदी करताना तो आंबट आहे की गोड कसा ओळखाल? जाणून घ्या टिप्स

पाटण्यातील दुधिया मालदा आंबे राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत पोहोचवले जातात. परदेशातही या आंब्याला मोठी मागणी आहे. पाटणा बिहार विद्यापीठातील आंबा बागेचे व्यवस्थापक प्रमोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक काळ असा होता की, संपूर्ण दिघा परिसरात आंब्याची मोठी बाग होती. मात्र, आता काँक्रीटीकरणाचे जंगल उभे राहिल्याने या आंब्याच्या बागांचा आकार कमी होत आहे.

पाणी नाही तर दुधावर पिकवला जातो आंबा

परिसरातील प्रचलित कथेनुसार, लखनौचे नवाब फिदा हुसेन पंडित फिरता फिरता दिघा भागात पोहोचले होते. गंगेच्या काठावरचे हे जंगल त्यांना आवडले, त्यानी आपले घर या ठिकाणी बांधले. नवाब फिदा यांना दूध आणि आंब्याची खूप आवड होती, असे परिसरातील वयोवृद्ध सांगतात. यामुळे त्यांनी दुधाने सिंचत असे हे आंब्याचे रोप पाकिस्तानच्या शाह फैसल मशिदीच्या परिसरातून आणले आणि पाटण्यातील आपल्या दिघा येथील घराजवळ लावले. यावेळी त्यांनी आपल्या घराजवळ अनेक गाई पाळल्या होत्या. दुधाचे उत्पादन जास्त प्रमाणात होत होते. यावेळी त्यांनी आंब्यांच्या झाडांना पाण्याऐवजी दूध घालण्याची आज्ञा केली. यातून अनेक दिवसांनी आंब्याची एक नवी प्रजाती तयार झाली, ज्याची चव अप्रतिम होती. या प्रजातीवरील आंब्याचे फळ आतून दुधाळ, रसाळ आणि पांढरे असल्यामुळे त्याला दुधिया मालदा असे नाव पडले. पूर्वी ही बाग एक हजार एकरांवर पसरलेली होती. पण, काळानुसार बागेचा आकार लहान होत गेला. सध्या राजधानी पाटण्यातील राजभवन, बिहार विद्यापीठ आणि सेंट झेवियर कॉलेजमध्ये दुधिया मालदाची बाग शिल्लक आहे.

दुधिया मालदाची किंमत किती?

गेल्या वर्षी ३३ देशांमध्ये हे आंबे निर्यात करण्यात आले होते. अमेरिका, इंग्लंड, जपान, दुबईसह अनेक देशांमध्ये हा आंबा आवडीने खाल्ला जातो. दरवर्षी ऑर्डर येतात, पण हा आंबा जूनमध्ये पिकतो, जो सुमारे १०० रुपये किलो दराने विकला जातो.

दुधिया मालदा हा रंग, सुगंध आणि चव यासाठी इतर आंब्यापेक्षा वेगळा आहे. गंगेच्या काठावर पिकणारे हे आंबे जगभर प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात, गंगेच्या पाण्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे कॅल्शियम आणि लोहाच्या मिश्रणामुळे दिघ्याची माती आंब्यासाठी उत्तम मानली जाते. यामुळे दिघ्यातील दुधिया मालदा आंब्याची चव आंब्याच्या इतर जातींच्या तुलनेत वेगळी आहे.

Story img Loader