चांगले कपडे आणि चप्पल किंवा शूूजशिवाय कोणीही घराबाहेर पडत नाही. चप्पल हा तर आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे. जर आम्ही तुम्हाला विचारले की, तुम्ही चप्पल शूजशिवाज घराबाहेर फिरू शकता का? तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे उत्तर ‘नाही’ असे असणार. खरं तर चप्पल शूजशिवाय तुम्ही एखादा दिवस घराबाहेर पडू शकता, पण त्यापेक्षा जास्त दिवस नाही; पण आज आम्ही तुम्हाला अशा गावाविषयी सांगणार आहोत, या गावात लोक कधीच पायात चप्पल घालत नाही.
गावाचे नाव
हे गाव भारतात आहे. आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपतीपासून ५० किमी दूर असलेल्या वेमना इंदलू या गावात लोक पायात चप्पल घालत नाहीत. या गावात येणाऱ्या लोकांना गावाच्या बाहेर चप्पल शूज काढावे लागतात. कितीही दूरवरचा प्रवास करायचा असेल, तरीसुद्धा हे लोक पायात चप्पल शूज घालत नाहीत.
हेही वाचा : Gold Rate : काय सांगता! अमेरिकेत भारतापेक्षा खरंच सोने स्वस्त मिळतं?
या गावातील लोक पायात चप्पल का घालत नाही?
वेमना इंदलू गावातील लोक व्यकंटेश्वर देवाला खूप मानतात. या देवाचा मान राखून हे लोक पायात चप्पल घालत नाहीत.अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही लोक पाळतात. या गावात व्यंकटेश्वर देवाचे वास्तव्य आहे, असे मानले जाते. पायात चप्पल घालून कधीच मंदिरात प्रवेश केला जात नाही. तसेच या गावाला हे लोक व्यंकटेश्वराचे मंदिर मानतात, त्यामुळे हे लोक चप्पल घालत नाही.
हेही वाचा : Cockroach Farming : ऐकावं ते नवलच! या ठिकाणी केली जाते झुरळांची शेती; आवडीने खातात लोक झुरळ!
हे लोक दवाखान्यात जात नाही
मीडिया रिपोर्टनुसार, हे लोक कधीही दवाखान्यात जात नाहीत. या गावातील लोकांनी कोरोना काळात कोविड लससुद्धा घेतली नाही. या लोकांच्या मते, व्यकंटेश्वर देव नेहमी त्यांच्या मदतीला धावून येतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही औषधीची किंवा दवाखान्याची आवश्यकता भासत नाही.